फेड एक्सप्रेसची विक्रमी घोडदौड...

By Admin | Updated: July 4, 2016 20:40 IST2016-07-04T20:40:19+5:302016-07-04T20:40:19+5:30

तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्यास प्रयत्नशील असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली

The fare of the express train ... | फेड एक्सप्रेसची विक्रमी घोडदौड...

फेड एक्सप्रेसची विक्रमी घोडदौड...

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ४ : तब्बल चार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्यास प्रयत्नशील असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. या दिमाखदार कामगिरीसह त्याने दिग्गज व महिला खेळाडू मार्टिना नवरातिलोवाच्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. त्याचवेळी दुसरीकडे जपानच्या केई निशिकोरी आणि महिलांमध्ये एग्निस्का रादवांस्का यांचे आव्हान संपुष्टात आले.


सात वेळचा विम्बल्डन चॅम्पियन आणि तृतीय मानांकीत फेडररने अमेरिकेच्या स्टिव्ह जॉनसनचा ६-२, ६-३, ७-५ असा पराभव करुन तब्बल १४व्यांदा विम्बल्डनच्या उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तसेच यासह फेड एक्सप्रेसने दिग्गज नवरातिलोवाने जिंकलेल्या ३०६ ग्रँडस्लॅम सामने विजयाची बरोबरीही केली. दरम्यान, जपानच्या निशिकोरीला नमवलेल्या क्रोएशियाच्या मारिन सिलिचचे उपांत्यपुर्व फेरीतफेडररपुढे कडवे आव्हान असेल.

पाठीच्या दुखापतीमुळे अंतिम क्षणी सामना सोडलेला निशिकोरी सुरुवातीपासूनच झगडताना दिसला. सिलिचविरुध्द १-६, १-५ असा पिछाडीवर असतानाच त्याने चिकित्सक आणि टे्रनर यांचा सल्ला घेत सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या दुखापतीचा मजबूत फटका निशिकोरीला बसला. यामुळे अवघ्या १० मिनिटातंच सिलिचने ५-० अशी भक्कम आघाडी घेतली होती.
त्याचवेळी महिलांमध्येही धक्कादायक निकाल लागला. तिसऱ्या मानांकीत रादवांस्काला स्लोवाकियाच्या १९व्या मानांकीत डॉमनिका चिबुलकोवाने अत्यंत अटीतटीच्या लढतीत ६-३, ५-७, ९-७ असे नमवून खळबळ माजवली. तर आॅस्टे्रलिया ओपन विजेती एंजलिक केरबरने सहजपणे उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश करताना जपानच्या मिसाकी दोइचे आव्हान ६-३, ६-१ असे संपुष्टात आणले. 

Web Title: The fare of the express train ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.