आघाडी कमी करण्यात अपयश
By Admin | Updated: November 19, 2014 04:09 IST2014-11-19T04:09:02+5:302014-11-19T04:09:02+5:30
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा आजचा ८ वा डाव फारशा चकमकी न होता अवघ्या ४१ चालित बरोबरीत सुटला आणि तमाम भारतीयांची निराशा झाली.

आघाडी कमी करण्यात अपयश
जयंत गोखले
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा आजचा ८ वा डाव फारशा चकमकी न होता अवघ्या ४१ चालित बरोबरीत सुटला आणि तमाम भारतीयांची निराशा झाली. आता अवघे ४ डाव शिल्लक राहिले आहेत आणि त्यातल्या दोन डावांत कार्लसनला पांढरी मोहरी असणार आहेत. कार्लसनला गाठून त्याच्यावर आघाडी घेण्यासाठी अनंदला आता आपला खेळ कमालीचा उंचवावा लागणार आहे.
आनंदच्या पहिल्या डी ४ चालिला जेव्हा कार्लसनने तिसऱ्या डावात खेळल्या गेलेल्या प्रकाराने उत्तर दिले तेंव्हा एक अजून सनसनाटी डाव बघायला मिळणार असे वाटू लागले होते. तिसऱ्या डावात झालेल्या दारुण पराभवातून कार्लसनने नवीन चाल शोधली असणार असाचा सर्वांचा कयास होता. परंतु सातव्या चालीला कार्लसनने डावात बदल केला आणि सी ६ च्या ऐवजी सी५ खेळून आनंदला प्रत्युत्तर दिले. या पद्धतीतून काळी मोहरी घेऊन खेळणाऱ्याला विनासायास बरोबरी मिळवीता येऊ शकते, असे प्रतिपाद गॅरी कास्पारोव्हने केले आहे. आपणास सर्वांना माहीत असेलच की कार्लसनची कार्यकिर्द घडवण्यात गॅरी कास्पारोव्हचा सिंहाचा वाटा आहे.
डावाच्या मध्यभागात आनंदला थोड्या फार संधी होत्या परंतु त्याचे रुपांतर विजयात करता येऊ शकेल, अशी चिन्हे नव्हती अगदी ठराविक अंतराने दोघांची मोहरी अदलाबदल करुन पटावरुन नाहीशी होत गेली आणि शेवटी ४१व्या चालीला दोघांनी बरोबरी स्वीकारली या बरोबरीने कार्लसनचे ४.५ गुण तर आनंदचे ३.५ गुण आहेत. उद्या विश्रांतीचा दिवस असणार आहे. ९ वा डाव गुरुवारी असेल आणि यांत कार्लसन पांढरी मोहरी घेऊन खेळणार आहे.