शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

आव्हान देण्यात अपयशी ठरलो - सुशील कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:21 AM

जागतिक कुस्तीत प्रतिआव्हान न देता सहज पराभव स्वीकारल्याची कबुली

नूर सुल्तान (कझाखस्तान) : ‘मॅटवर पुरेसा वेळ न घालविता मोठ्या स्पर्धेला सामोरे जाणे घोडचूक ठरली. नव्या दमाने पुनरागमन करण्यासाठी अधिक जोमाने सराव करावा लागेल,’ असे मत अनुभवी मल्ल सुशील कुमार याने व्यक्त केले. जागतिक कुस्तीत प्रतिआव्हान न देता सहज पराभव स्वीकारल्याची कबुलीही सुशीलने दिली आहे.लंडन २०१२ व २०१९ च्या जागतिक स्पर्धेदरम्यान ७ वर्षांत सुशील केवळ सात स्पर्धा खेळला, हे विशेष. जकार्ता आशियाई स्पर्धेत तो सहज पराभूत होताच ३६ वर्षांचा हा मल्ल आव्हान सादर करण्यास सक्षम आहे का, याविषयी शंका उपस्थित झाली होती. जागतिक स्पर्धेतून टोकियो आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुशीलने अलीकडे रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव यांच्या मार्गदर्शनात सराव सुरू केला.सुशील म्हणाला, ‘मी पराभूत झालो पण चांगला खेळलो. जकार्ताच्या तुलनेत येथे माझ्या खेळात वेग होता. या स्पर्धेतून दमदार पुनरागमन करीत असल्याचे संकेत देऊ इच्छित होतो. येथे उपस्थित विदेशी प्रशिक्षकांचे माझ्याबाबतचे मत असेच काहीसे होते. सध्या माझ्यात ऊर्जा कमी असून बचाव कमकुवत आहे. सराव व व्यायामाच्या जोरावर उर्जा कमविण्यास किमान ९० दिवस लागतील, असे प्रशिक्षकाचे मत आहे.’

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारWrestlingकुस्ती