Fact Check: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची निवृत्ती? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

By स्वदेश घाणेकर | Updated: November 2, 2020 16:22 IST2020-11-02T16:21:12+5:302020-11-02T16:22:20+5:30

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला.

Fact Check: 'I RETIRE' - Ace Indian shuttler PV Sindhu's post takes social media by storm | Fact Check: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची निवृत्ती? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

Fact Check: ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूची निवृत्ती? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू हिनं सोमवारी चाहत्यांना धक्काच दिला. हैदराबादच्या या खेळाडूनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यात तिनं 'Retire' हा शब्द वापरला. तिनं केलेल्या भल्यामोठ्या पोस्टमध्ये डेन्मार्क ओपन ही अंतिम स्पर्धा आणि तिनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, असे लिहिले. तिची ही पोस्ट थोड्याच वेळात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आणि चर्चेवर चर्चा रंगली. 

''मला काय वाटतं हे मी स्पष्टपणे मनमोकळेपणानं तुम्हाला सांगण्याचा अनेक दिवसांपासून विचार करत होते. या परिस्थितिचा सामना करताना मी अडखळले, हे प्रामाणिकपणे सांगते. मला चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. अखेर मी आज माझं मन मोकळे करते. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल किंवा तुम्ही बुचकळ्यात पडाल, परंतु ही पोस्ट संपेपर्यंत मला नेमकं काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळेल. आशा करते की तुम्ही मला पाठिंबा द्याल,''असे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूनं म्हटलं.  

''कोरोनाच्या या संकटानं माझे डोळे उघडले. मला सराव करता आला नाही. कोर्टवरील प्रतिस्पर्धीला मी पराभूत करू शकते, परंतु या न दिसणाऱ्या शत्रूचा कसा सामना करू? अनेक महिने मी घरीच आहे आणि घराबाहेर पडायचं का, हा प्रश्न अजूनही आपण स्वतःला विचारतोय. या काळात आपण काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अनेक बातम्याही वाचल्या. मलाही डेन्मार्क ओपनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करता आले नाही,''असे सिंधू म्हणाली.

तिनं पुढे लिहिले की,''आज मी या सर्व संकटातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. मी नकारात्मकतेतून, सततच्या भीतीपासून निवृत्त होतेय.''
 


आशिया ओपन स्पर्धेत मी कोर्टात उतरणार आहे आणि त्यासाठी कसून सराव करण्यास सुरुवात करत आहे, असे तिनं म्हटले आहे.  

Web Title: Fact Check: 'I RETIRE' - Ace Indian shuttler PV Sindhu's post takes social media by storm