सामना
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:04:18+5:30
चेन्नईच सुपर

सामना
च न्नईच सुपरमुंबई इंडियन्सवर मातस्वदेश घाणेकर मुंबईगोलंदाजांनी रचून दिलेल्या पायावर ड्वेन स्मिथने (५७ धावा, ५ चौकार, ३ षटकार) अर्धशतकी खेळी करीत कळस चढविला आणि चेन्नई सुपरकिंग्जने शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई इंडियन्सचा ४ गडी व ३ चेंडू राखून पराभव करीत आयपीएलच्या सातव्या पर्वात सातवा विजय मिळविला.चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा डाव ६ बाद १५७ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.३ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ड्वेन स्मिथसह फॅफ ड्यूप्लेसिस (३१ धावा, २४ चेंडू, २ चौकार, १ षटकार), सुरेश रैना (१९) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (नाबाद २२ धावा, १२ चेंडू, १ चौकार, १ षटकार) यांनी चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ११ धावांची गरज असताना कर्णधार धोनीने पोलार्डच्या या षटकातील पहिल्या तीन चेंडूवर विजय साजरा केला. धोनीने षटकार व चौकार ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, अंबाती रायडू (५९ धावा, ४३ चेंडू, २ चौकार, ४ षटकार) व लेंडल सिमन्स (३८ धावा, ३ चौकार, २ षटकार) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आव्हानात्मक धावसंख्येची मजल मारली. रविचंद्रन अश्विनने ३० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत मुंबईचा डाव रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.