वेस्ट इंडिजचा हा विस्फोटक फलंदाज निवृत्त
By Admin | Updated: March 2, 2017 14:10 IST2017-03-02T14:10:26+5:302017-03-02T14:10:26+5:30
वेस्ट इंडिजच्या 35 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

वेस्ट इंडिजचा हा विस्फोटक फलंदाज निवृत्त
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 2 - वेस्ट इंडिजच्या 35 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्फोटक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 35 वर्षीय ड्वेन स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2003/04 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. चौदा वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथने वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले.
स्मिथ सध्या दुबईत सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. सेमीफायनलनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. वेगवेगळ्या देशात खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये ड्वेन खेळत राहणार आहे. आयपीएलमध्येही सध्या तो गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.
शतकी खेळी करत कारकीर्दीची सुरवात करणाऱ्या ड्वेनला आपल्या 10 कसोटीच्या छोट्या कार्यकाळात खास छाप सोडता आली नाही. मात्र टी-20 मध्ये त्याने आपलं स्थान निर्माण केलं होतं. स्मिथने वेस्ट इंडिजकडून शेवटचा एकदिवसीय सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला होता. तर अखेरची कसोटी 2006 साली खेळली होती.