शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

लंकेला सूर गवसण्याची अपेक्षा

By admin | Updated: February 26, 2015 00:53 IST

चांगली कामगिरी करण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या श्रीलंका संघाला उद्या (गुरुवारी) विश्वचषकात बांगलादेशाविरुद्ध धडाकेबाज कामगिरीसह

मेलबर्न : चांगली कामगिरी करण्यात सतत अपयशी ठरणाऱ्या श्रीलंका संघाला उद्या (गुरुवारी) विश्वचषकात बांगलादेशाविरुद्ध धडाकेबाज कामगिरीसह विजय मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन विश्वचषकांचा उपविजेता लंकेचा संघ यंदा ठोस सुरुवात करू शकला नाही. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर त्यांच्या फलंदाजांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. या सामन्यामध्ये जीवन मेंडीजच्या ऐवजी उपल तरंगाला संधी देण्यात येण्याची शक्यता आहे.ख्राईस्टचर्चच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने लंकेचा ९८ धावांनी पराभव केला. ड्यूनेडिनच्या दुसऱ्या सामन्यातही अफगाणिस्तानविरुद्ध त्यांचे सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. अनुभवी माहेला जयवर्धने याने बुडते जहाज किनाऱ्याला लावून मोठ्या पराभवापासून वाचविले होते. अफगाणिस्तानच्या २३२ धावांचा पाठलाग करणाऱ्या लंकेने १८ धावांत ३, तसेच ५१ धावांत ४ गडी गमावले. दोन सामन्यांत लंकेचे केवळ २ गुण असल्याने मोठ्या विजयासह लय मिळविण्याच्या प्रतीक्षेत हा संघ दिसतो. १९९६च्या विश्वविजेत्या लंकेने बांगलादेशाविरुद्ध आतापर्यंत ३७ वन डे खेळले. त्यांत ३२ जिंकले. विश्वचषकातील या संघाचा रेकॉर्ड फार चांगला आहे. २००३च्या विश्वचषकात बांगलादेशावर दहा गड्यांनी विजय नोंदविला होता. शिवाय, २००७मध्ये १९८ धावांनी धुव्वा उडविला.अफगाणिस्तानविरुद्ध विजय नोंदविल्यानंतर माहेलाने कबुली दिली, की संघात सुधारणा होण्यास वाव आहे. अशा प्रकारच्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करणे योग्य लक्षण आहे. संघाची कामगिरी सुधारायला हवी. कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान हे अद्याप चमकले नाहीत. याशिवाय, दिशाहीन गोलंदाजी मुख्य चिंता राहिली आहे. अफागाणिस्तानविरुद्ध त्यांच्या गोलंदाजांनी १६ वाईड आणि एक नो बॉल टाकला होता. वेगवान लसिथ मलिंगाने तर २ सामन्यांत १२५ धावा मोजल्या.दुसरीकडे, बांगलादेश संघ दोन्ही सामन्यांत अपराजित राहिला. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत पावसामुळे गुणविभागणी झाल्यानंतर अफगाणिस्तावर त्यांनी १०५ धावांनी विजय साजरा करताच अ गटातून उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग प्रशस्त केला. यापुढील ४ सामने त्यांना श्रीलंका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि स्कॉटलंडविरुद्ध खेळायचे आहेत. बांगलादेश संघ पहिल्यांदा एमसीजीवर खेळणार आहे. या संघाचा वेगवान गोलंदाज अल् अमीन हुसेन रात्री १० नंतर हॉटेलमध्ये परतल्याने त्याला आयसीसीने विश्वचषकात खेळण्यास बंदी घातली. त्याची जागा शफीउल इस्लामने घेतली. (वृत्तसंस्था)