पंजाब-कोलकाता रंगतदार लढत होण्याची अपेक्षा

By Admin | Updated: May 4, 2016 04:03 IST2016-05-04T04:03:24+5:302016-05-04T04:03:24+5:30

कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Expectations of Punjab-Kolkata to be a colorful fight | पंजाब-कोलकाता रंगतदार लढत होण्याची अपेक्षा

पंजाब-कोलकाता रंगतदार लढत होण्याची अपेक्षा

कोलकाता : कोलकाता नाइट रायडर्सला (केकेआर) उद्या (बुधवारी) आयपीएलच्या नवव्या पर्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत चकमदार कामगिरीची अपेक्षा आहे. नेतृत्वामध्ये बदल झाल्यामुळे कामगिरी सुधारली असल्याचे संकेत प्रतिस्पर्धी किंग्ज इलेव्हन संघाने दिले आहेत. त्यामुळे उभय संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे.
जवळजवळ तीन आठवडे गृहमैदानापासून दूर असलेल्या, दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या केकेआर संघाने प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानावर आपल्या सातपैकी जवळजवळ सहा सामने खेळले असून, त्यांपैकी चार जिंकले आहेत. सोमवारी युसूफ पठाण व आंद्रे रसेल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाविरुद्ध पाच गडी राखून विजय मिळवल्यानंतर केकेआर संघ ईडन गार्डन्सवर परतत आहे.

उभय संघ यातून निवडणार
कोलकाता नाइट रायडर्स :
गौतम गंभीर (कर्णधार), सुनील नारायण, रॉबिन उथप्पा, पीयूष चावला, युसूफ पठाण, शकीब अल् हसन, मॉर्ने मॉर्केल, उमेश यादव, मनीष पांडे, जयदेव उनाडकट, जॉन हेस्टिंग्ज, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, आंद्रे रसेल, ब्रॅड हॉग, कुलदीप यादव, कॉलिन मन्रो, शेल्डन जॅक्सन, जॉन हेस्टिंग्ज, जेसन होल्डर, ब्रॅड हॉग, मनन शर्मा, राजगोपाल सतीश व सूर्यकुमार यादव.
किंग्ज इलेव्हन पंजाब :
डेव्हिड मिलर (कर्णधार), काईल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, निखिल नाईक, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहरदिन, के. सी. करीअप्पा, अरमान जफर, प्रदीप साहू, निखिल नाईक, मनन वोरा व स्वप्निल सिंग.

Web Title: Expectations of Punjab-Kolkata to be a colorful fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.