भारताकडून चमत्काराची अपेक्षा !

By Admin | Updated: December 9, 2014 01:40 IST2014-12-09T01:40:33+5:302014-12-09T01:40:33+5:30

मंगळवारी चॅम्पियन चषक स्पध्रेत ‘ब’ गटातील शेवटच्या सामन्यात विश्वचषकात रौप्यपदक पटकावणा:या नेदरलँडशी मुकाबला करावा लागणार आहे.

Expectations from India! | भारताकडून चमत्काराची अपेक्षा !

भारताकडून चमत्काराची अपेक्षा !

भुवनेश्वर : सलग दोन पराभवांमुळे उत्साह गमावून बसलेल्या भारतीय पुरुष संघाला आज, मंगळवारी चॅम्पियन चषक स्पध्रेत ‘ब’ गटातील शेवटच्या सामन्यात विश्वचषकात रौप्यपदक पटकावणा:या नेदरलँडशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे भारताकडून या लढतीत चमत्काराची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 
या स्पध्रेतील भारताची सुरुवात दयनीय झाली. ऑलिम्पिक चॅम्पियन जर्मनीने त्यांना 1-क् असे पराभूत करून पहिल्याच लढतीत झटका दिला. त्यानंतर सोमवारी झालेल्या सामन्यात 2-क् अशा आघाडीवर असूनही सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाला अर्जेटिनाकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला. या दोन पराभवांमुळे भारत ‘ब’ गटात शेवटच्या स्थानावर फेकला गेला असून, त्यांना बाद फेरीत ‘अ’ गटात अव्वल स्थानावर असलेल्या संघाचे आव्हान पेलावे लागेल. या स्पध्रेच्या नियमानुसार आठही संघांचे बाद फेरीत स्थान पक्के आहे. जय-पराजय हा खेळाचा भाग असला तरी ज्या पद्धतीने भारताला पराभूत व्हावे लागले आहे, ते दुर्दैवी असल्याचे जाणकारांचे मत आहे. 
जर्मनीविरुद्धच्या लढतीबाबत बोलायचे झाल्यास, केवळ उपकर्णधार आणि गोलकिपर पी. आर. o्रीजेश यानेच कडवी झुंज देत जर्मनीचे आक्रमण अचूक परतवले. मात्र, फ्लोरियन फुश याने अखेरच्या क्षणाला गोल करून भारताच्या पराभवावर शिक्कामोर्तब केले. o्रीजेशने झुंज दिली नसती, तर भारताला मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला असता हे निश्चित होते. अर्जेटिनाविरुद्ध भारताच्या आघाडीच्या फळीने गोल नोंदविण्याच्या संधी निर्माण केल्या; पण बचावफळीने अर्जेटिनाला आक्रमक चाली रचण्याच्या संधी प्रदान केल्या. माजी प्रशिक्षक टेरी वॉल्श यांच्या मेहनतीने गेल्या वर्षभरात उभा राहिलेला संघ त्यांच्या अनुपस्थितीत ढासळलेला पाहायला मिळाला. (वृत्तसंस्था)
 
आजच्या लढती
‘ब’ गट अर्जेटिना वि. जर्मनी12:क्क्
‘अ’ गट इंग्लंड वि. बेल्जियमक्2:क्क्
‘अ’ गट ऑस्ट्रेलिया वि. पाक5:3क्
‘ब’ गट नेदरलँड वि. भारत7:3क्

 

Web Title: Expectations from India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.