चांगली कामगिरी करून करार वाढविण्यास उत्सुक
By Admin | Updated: April 8, 2017 23:51 IST2017-04-08T23:51:13+5:302017-04-08T23:51:13+5:30
स्वीडनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचच्या निलंबनानंतर सुंदरलँडविरुद्धच्या सामन्यासाठी मँचेस्टर युनायटेड संघात सामिल झाला आहे. मँचेस्टर युनायटेड

चांगली कामगिरी करून करार वाढविण्यास उत्सुक
- झ्लाटन इब्राहिमोविचशी केलेली बातचित
स्वीडनचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झ्लाटन इब्राहिमोविचच्या निलंबनानंतर सुंदरलँडविरुद्धच्या सामन्यासाठी मँचेस्टर युनायटेड संघात सामिल झाला आहे. मँचेस्टर युनायटेड हा संघ चेल्साकडून आॅक्टोबर महिन्यात ०-४ ने पराभूत झाल्यानंतर आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे. पण यामध्ये दहा सामने अनिर्णीत आहेत. यामुळे त्यांनी २० गुण गमावले आहेत. यातील शेवटचा सामना संघाचे होम ग्राउंड असलेल्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात सुंदरलँडबरोबर १-१ असा ड्रॉ झाला. यात इब्राहिमोविचने पेनाल्टीवर केलेल्या गोलमुळे मँचेस्टर युनायटेडला बरोबरी साधता आली. या आठवड्याच्या शेवटी प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. आज, रविवारी सुंदरलँड विरुद्ध मँचेस्टर युनायटेड असा सामना रंगत आहे. या सामन्यातून इब्राहिमोविच सत्रात पुनरागमन करीत आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून मँचेस्टर युनायटेडसोबतचा आपला करार वाढवण्यासाठी ३५ वर्षीय इब्राहिमोविच उत्सुक असेल. याबाबत त्याच्याशी केलेली बातचित...
हा सिझन तुझ्यासाठी नक्कीच चांगला गेला आहे. ४२ सामन्यांत २७ गोल ही कामगिरी ३५व्या वर्षी नक्कीच चांगली म्हणावी लागेल. इंग्लंडमध्ये खेळल्यामुळे तू दिवसेंदिवस तरुण होत चालला आहेस का?
मलाही तसेच वाटते... माझी कामगिरी दरवर्षी चांगलीच
होते, यंदाही मी त्याची पुनरावृत्ती केली आहे, इतकेच. पण काही लोक अजूनही ही गोष्ट स्वीकारायला तयार नाहीत.
तुला हे जमणार नाही, असे लोकांना वाटत होते, त्यांना खोटे ठरवण्यासाठी तू इंग्लंडला आलास का?
सर्वांत महत्त्वाचे हे आहे की,
माझा कशावर विश्वास आहे, मी
काय ठरवले होते, आणि त्याच दृष्टीने माझी वाटचाल सुरू असते, बाकी कोणी काही म्हणोत, हा त्यांचा प्रश्न आहे.
संघासोबतच्या तुझ्या कराराला मुदतवाढ मिळेल, असे तुला वाटते का?
-बघूया काय होतंय ते!, बऱ्याच गोष्टी आता स्थिरस्थावर झाल्या आहेत. माझा खेळ आता एक दोन वर्षेच शिल्लक आहे. क्लब काय निर्णय घेतो, यावर सगळ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
संघ चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरला तरच तुझा करार वाढवण्यात येईल, असे बोलले जाते, त्याबाबतीत काय सांगशील?
माझा करार आणि चॅम्पियन लीगची पात्रता याचा काहीही संबंध नाही. कोणीतरी जाणीवपूर्वक अशा अफवा पसरत आहे.
यावर्षीच्या जबरदस्त कामगिरीची पुन्हा पुढील वर्षी पुनरावृत्ती होईल असे तुला वाटते का?
पुढच्या वर्षी मला जे काही करणे शक्य आहे, ते मी करणारच. मी माझ्या कामगिरीवर कधीही समाधानी नसतो. जे मिळवले आहे, त्याच्यापेक्षा आणखी जास्त मिळण्याचे ध्येय असते. तो माझ्या आयुष्यातील पुढचा अध्याय असेल.
आणखी किती वर्षे तू खेळणार आहेस?, चाळिशीपर्यंत खेळू, असे तुला वाटते काय?
कारकिर्दीच्या शिखरावर असताना थांबायला मला आवडेल. माझा खेळ ज्यावेळी चांगला होणार नाही, माझ्यामुळे संघाला फायदा होणार नाही, असे मला वाटले की खेळायचे थांबवेन. इतरांसारखे मी मागील पुण्याईवर संघात स्थान अडवून ठेवणार नाही. (पीएमजी)