भारतीय संघाच्या शिबिरात सर्वांचे लक्ष हरभजनवर

By Admin | Updated: June 7, 2015 12:31 IST2015-06-07T01:02:54+5:302015-06-07T12:31:23+5:30

भारतीय कसोटी क्रिकेट संघ बांगलादेशाच्या छोट्या दौऱ्याआधी ट्रेनिंग शिबिरासाठी जेव्हा ईडन गार्डन्सच्या मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा

Everybody focuses on Harbhajan Singh's camp | भारतीय संघाच्या शिबिरात सर्वांचे लक्ष हरभजनवर

भारतीय संघाच्या शिबिरात सर्वांचे लक्ष हरभजनवर

कोलकाता : भारतीय कसोटी क्रिकेट संघ बांगलादेशाच्या छोट्या दौऱ्याआधी ट्रेनिंग शिबिरासाठी जेव्हा ईडन गार्डन्सच्या मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा सर्वांचे लक्ष असणार आहे ते दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनसिंगवर.
भारताचा सर्वांत यशस्वी आॅफस्पिनर हरभजनसिंगने त्याचा याआधीचा कसोटी सामना हैदराबाद येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये खेळला होता. आता त्याला १० ते १४ जूनदरम्यान बांगलादेशात होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी रवींद्र जडेजाच्या स्थानी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ येथे पोहोचला आहे. हरभजनसिंगचे पुनरागमन आणि नियमित आॅफस्पिनर रवीचंद्रन आश्विन याच्या उपस्थितीत कोहली फतुल्लाह येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात दोन आॅफस्पिनरला मैदानात उतरवतो का हे पाहणे रोचक असणार आहे.
विशेष म्हणजे कसोटी सामन्यासाठी कोणत्याही सिनिअर खेळाडूला विश्रांती देण्यात आलेली नाही. या दौऱ्यासाठी संघाचे संचालक रवी शास्त्री यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरकडून खेळल्यानंतर आता बांगलादेशमध्ये भरीव कामगिरी करण्यास आतुर असेल. भारतीय संघाचे फिटनेस आणि ट्रेनिंग शिबीर काल सकाळी होणार होते; परंतु उष्ण हवामानामुळे ते स्थगित करण्यात आले होते, असे बंगाल क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निवासस्थानी प्रथमच नवनियुक्त क्रिकेट सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: Everybody focuses on Harbhajan Singh's camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.