ईडनच्या प्रेमात पडलेल्या रोहितने सर केलं विक्रमाचं एव्हरेस्ट
By Admin | Updated: November 14, 2014 02:20 IST2014-11-14T02:20:25+5:302014-11-14T02:20:25+5:30
अपेक्षांचे एव्हरेस्ट सर करताना रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वात सर्वोच्च धावांची खेळी साकारली. त्याच्या या बहारदार खेळीने विरेंद्र सेहवागचा 219 धावांचा विक्रम मागे टाकलाच,

ईडनच्या प्रेमात पडलेल्या रोहितने सर केलं विक्रमाचं एव्हरेस्ट
विनय नायडू ल्ल
अपेक्षांचे एव्हरेस्ट सर करताना रोहित शर्मानं एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वात सर्वोच्च धावांची खेळी साकारली. त्याच्या या बहारदार खेळीने विरेंद्र सेहवागचा 219 धावांचा विक्रम मागे टाकलाच, शिवाय ईडन गार्डनवरील आणि प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरुन आला असेल. मैदानावर विक्रम रचून परतल्यावर सहका:यांनी त्याला गार्ड ऑफ ऑनर देवून त्याची ही खेळी ही संस्मरणीय ठरविली.
दुखापतीमुळे जवळ जवळ अडीच महिन्यानंतर मैदानावर परतून पहिल्याच खेळीत लय मिळविणं तसे सोपे काम नाही. रोहितला गुणवत्तेचं दैवी वरदान लाभले आहे, तो हीरा आहे, हे भारतीय संघात निवड झाल्यापासून त्याच्या शैलीवरुन कळतं. पण या सुरवातीला ओबडधोबड असणारा या हि:याला आता पैलू पडले असल्याचं आज त्याच्या धुवाधार खेळीवरुन सिध्द झाले आहे.
मुंबईत श्रीलंकेविरुध्दच्या सराव सामन्यात रोहितने शतक झळकावून आपला फिटनेस सिध्द केला होता. गुरुवारी त्याने भारतीय संघाकडून खेळताना प्रेक्षकांसाठी आनंदपर्वणी मिळवून दिली.
आजच्या युवा भारतीय संघात अजिंक्य रहाणोकडे गुणवत्ता आहे, शिखर धवनकडे आक्रमकता आहे, तर विराट कोहलीकडे क्लास आणि सातत्य आहे. पण रोहीत शर्मा जेव्हा रंगात येतो तेव्हा सगळय़ा देशवासियांना या रंगाने तो न्हावू घालतो.
गुरुवारी त्यानं जी खेळी केली ती या सर्वावर मुकुटमणी शोभावी अशीच होती. आपल्या फलंदाजीविषयी अलिकडे बोलताना रोहीत म्हणाला होता की, माझी गुणवत्ता ही मी कष्टाने कमावलेली संपत्ती आहे. तीच गोष्ट त्याने आज दाखवून दिली. या संपत्तीचे ्त्याने केलेलं प्रदर्शन तिकेच रम्य आणि मनोहारी होतं. त्याच्या खेळीत
आज बर्फाची शितलता आणि धगधगणारी आगही होती, ताकदही होती अन कृपाही होती. एकीकडे डावाला आकार देणारी होती तर आक्रमताही होती.
पहिल्या 16 चेंडूत केवळ 4 धावा करुन त्याने खेळपट्टीवर बस्तान बसविले. त्यात तिसरा परेराने त्याला जीवदान देवून आयुष्यभराचा डाग लावून घेतला. जेव्हा तो स्थिरावला तेव्हा त्याने आपला इंगा दाखवण्यास सुरवात केली. अर्धशतकासाठी 72 चेंडू घेणा:या रोहीतने 101 चेंडूत शतक पूर्ण केले. शेवटच्या पाच षटकांमध्ये त्याने ‘धावस्फोट’ केला.
शेवटच्या चेंडूवर त्याला अली ब्राउनने कौंटीमध्ये नोंदविलेल्या 268 धावांचा विक्रम गाठण्यासाठी केवळ चौकाराची गरज होती, पण त्याने सेफ गेम न करता षटकार ठोकून संघाच्या धावा कशा वाढतील याला महत्त्व दिले. यात तो ङोलबाद झाला. या त्याच्या निस्वार्थी वृत्तीला सलाम करावा तेवढा थोडाच आहे.
लकी ग्राऊंडवर चौकार - षटकारांची आतषबाजी
नागपुरात जन्मलेल्या आणि मुंबईत वाढलेल्या रोहीत शर्माचे ईडन गार्डनशी खास वेगळे काहीतरी नातं आहे. याच मैदानावर त्यानं शतक ठोकून रणजी स्पर्धेत पदार्पण केले होते. याही पुढे जावून त्याने कसोटीतील पदार्पण याच मैदानावर केले आणि तेही शतकानेच. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये त्यानं वेस्ट इंडीज संघाविरुध्द 177 धावा फटकावून त्यानं आपलं पदार्पण साजरं केले होते. हा योगायोग इथेच संपत नाही. आयपीएलमधील त्याचे एकमेव शतक याच ईडन गार्डनवर झालेलं आहे. गेल्या सत्रत मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द त्याने हे शतक केले होते.