आजही माझी भूमिका पूर्वीचीच : हरभजन

By Admin | Updated: June 8, 2015 00:48 IST2015-06-08T00:48:54+5:302015-06-08T00:48:54+5:30

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनामध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असलेला भारताचा दिग्गज आॅफ स्पिनर हरभजन सिंगने माझ्या भूमिकेमध्ये बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले.

Even today my role is: Harbhajan | आजही माझी भूमिका पूर्वीचीच : हरभजन

आजही माझी भूमिका पूर्वीचीच : हरभजन

कोलकाता : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनामध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असलेला भारताचा दिग्गज आॅफ स्पिनर हरभजन सिंगने माझ्या भूमिकेमध्ये बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले. पाच-सात वर्षांपूर्वी माझी असलेली भूमिका आताही कायम आहे. त्यावेळी हरभजन गोलंदाजीचा प्रमुख होता.
भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या हरभजनला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास होता. हरभजन म्हणाला, ‘गेल्या दोन वर्षांपासून संघाबाहेर होतो, पण संधी मिळाल्यानंतर चमकदार कामगिरी करण्यास प्रयत्नशील होतो. मी आयपीएलमध्ये खेळलो. सीनिअर खेळाडूंसोबत चर्चा केली. त्यांनी माझ्यात अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असल्याचे सांगितले. सहकार्य करण्याची तयारी असलेले सीनिअर खेळाडू असल्यामुळे खूश आहे. संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला आहे.

‘विराटमुळे संघात उत्साह संचारतो’
भारतीय कसोटी संघाच्या कर्णधाराबाबत बोलताना हरभजन म्हणाला, ‘विराट मॅचविनर आहे. प्रतिस्पर्धी कुणीही असला, तरी विराट जिंकण्यास उत्सुक असतो. हा त्याच्यातील चांगला गुण आहे. विराटची कर्णधारपदी नियुक्ती ही संघासाठी चांगली बाब आहे. विराटमुळे संघामध्ये उत्साह संचारतो. त्याला आव्हान स्वीकारणे आवडते. ऊर्जावान कर्णधार असला, तर संघातही ऊर्जा संचारते.’ हरभजनने आॅस्ट्रेलियात कोहलीने केलेल्या नेतृत्वाची प्रशंसा केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Even today my role is: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.