युरो चषकाच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पोर्तुगालची पोलंडशी पहिल्या हाफमध्ये बरोबरी
By Admin | Updated: July 1, 2016 01:32 IST2016-07-01T01:31:04+5:302016-07-01T01:32:13+5:30
युरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंड अणि पोर्तुगाल यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली.

युरो चषकाच्या क्वॉर्टर फायनलमध्ये पोर्तुगालची पोलंडशी पहिल्या हाफमध्ये बरोबरी
ऑनलाइन लोकमत
मर्सेल, फ्रान्स, दि. 1 - युरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोलंड अणि पोर्तुगाल यांनी पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधली.
पोलंडच्या रॉबर्टो लेवंड्स्की याने दुसऱ्या मिनिटालाच गोल केला. त्याच्या या गोलने सामन्यात पोलंडने वर्चस्व गाजवण्याचे संकेत दिले. पोलंडने जबरदस्त आक्रमण करत पोर्तुगालला हैराण केले. मात्र त्यानंतर पोर्तुगालच्या खेळाडूंनीही अप्रतीम संरक्षण केले. गोल करण्याचे पोलंडचे ९ प्रयत्न उधळून लावले. ३३ व्या मिनिटाला रेनॅटो सॅन्शेस याने अप्रतिम फुटवर्कचे प्रदर्शन करत पोर्तुगालसाठी गोल केला. आणि पहिल्या हाफमध्ये बरोबरी साधून दिली.