युरो चषक : वेल्स उपांत्य फेरीत
By Admin | Updated: July 2, 2016 02:20 IST2016-07-02T02:20:36+5:302016-07-02T02:20:36+5:30
रो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्सने बेल्जिअमवर ३ -१ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली.

युरो चषक : वेल्स उपांत्य फेरीत
ऑनलाइन लोकमत
लिली, फ्रान्स, दि. 2- युरो चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात वेल्सने बेल्जिअमवर ३ -१ अशी मात करत उपांत्य फेरी गाठली. वेल्सचा उपांत्य फेरीचा सामना आता पोर्तुगालसोबत होईल.
मध्यंतरापर्यंत १-१ अशी बरोबरी होती. सामन्यातील पहिला गोल बेल्जिअमच्या नॅनगॅलोन याने १३ व्या मिनिटालाच केला. त्यानंतर वेल्सचा कर्णधार अॅशले विल्यम्स याने ३१ व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीवर आणला. दुसऱ्या हाफमध्ये ५५ व्या मिनिटाला रॉबसन कांगु याने वेल्ससाठी दुसरा गोल करत आघाडी मिळवून दिली. तर बदली खेळाडू व्होक्स या ८६ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.