युरो चषक : इंग्लंड 'नॉकआउट'मध्ये
By Admin | Updated: June 21, 2016 18:52 IST2016-06-21T18:35:02+5:302016-06-21T18:52:59+5:30
स्लोवाकियाविरुद्ध गोलशून्य अशा बरोबरीच्या निकालानंतरही इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या नॉक आउट फेरीत (अंतिम १६) प्रवेश केला आहे. या निकालाने मात्र इग्लंडने

युरो चषक : इंग्लंड 'नॉकआउट'मध्ये
ऑनलाइन लोकमत
सेंट एटिनी (फ्रान्स), दि. 21 - स्लोवाकियाविरुद्ध गोलशून्य अशा बरोबरीच्या निकालानंतरही इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या नॉक आउट फेरीत (अंतिम १६) प्रवेश केला आहे. या निकालाने मात्र इग्लंडने 'ब' गटातील अव्वल स्थान गमावले.
तोलोसमध्ये रशियावर ३-० ने मात करणारा वेल्स संघाने मात्र या गटात अव्वल स्थान काबिज केले. स्लोवाकिया संघ पराभव वाचवण्यासाठी खेळत असल्याचे दिसत होते. तसा प्रयत्न गोलरक्षक मातुस कोजासिक याने यशस्वी ठरवला. त्याने प्रतिस्पर्धी संघाचे प्रयत्न अपयशी ठरवले.
आता तिसऱ्या स्थनानावरील चार सर्वश्रेष्ठ संघांपैकी एक कोणता संघ नॉकआउटमध्ये स्थान निश्चित करतो, याचीच प्रतिक्षा स्लोवाकिया संघाला करावी लागेल.