रियोमध्ये कॅब चालक शिकणार इंग्रजी

By Admin | Updated: August 9, 2015 22:35 IST2015-08-09T22:35:22+5:302015-08-09T22:35:22+5:30

ब्राझीलच्या रियोमध्ये सन २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेदरम्यान परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी रियोमधील कॅब

English learner in Rio | रियोमध्ये कॅब चालक शिकणार इंग्रजी

रियोमध्ये कॅब चालक शिकणार इंग्रजी

रियो डि जेनेरियो : ब्राझीलच्या रियोमध्ये सन २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेदरम्यान परदेशी पाहुण्यांचा पाहुणचार आणि त्यांच्यासोबत सुसंवाद साधण्यासाठी रियोमधील कॅब आणि टॅक्सी चालकांसाठी मोफत इंग्रजी कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे़
रियो डि जेनेरियो येथे २०१६, रेडियो ग्लोबो आणि इंग्लिश फर्स्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या या योजनेंतर्गत जवळपास १० हजार आॅनलाईन कोर्स सुरु करण्यात आले आहेत़ याद्वारे कोणताही कॅब आणि टॅक्सी चालक आपल्या इंग्रजीमध्ये सुधारणा घडवू शकतो़ याशिवाय कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याला एक प्रमाणपत्र देण्यात येईल़ जे देशातील शिक्षण मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त असेल़ हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर आॅलिम्पिक दरम्यान जगभरातून येणारे हजारो खेळाडू संघ व्यवस्थापक, क्रीडाप्रेमी यांना भाषेची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: English learner in Rio