इंग्लंडच्या विजयात रुनी ‘हिरो’
By Admin | Updated: June 16, 2015 02:08 IST2015-06-16T02:08:05+5:302015-06-16T02:08:05+5:30
विद्यमान चॅम्पियन स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत बेलारुसचा पराभव केला. तर, अखेरच्या क्षणी वायने रुनी याने नोंदवलेल्या

इंग्लंडच्या विजयात रुनी ‘हिरो’
पॅरिस : विद्यमान चॅम्पियन स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत बेलारुसचा पराभव केला. तर, अखेरच्या क्षणी वायने रुनी याने नोंदवलेल्या गोलच्या बळावर इंग्लंडने स्लोवेनियावर मात केली. स्पेनकडून मँचेस्टर सिटीच्या डेविड सिल्वाने विजयी गोल नोंदविला. ज्लाटान इब्राहिमोविचच्या दोन गोलच्या बळावर स्वीडनने मोंटेग्रीनीचा पराभव केला. दुसरीकडे, आॅस्ट्रियाने रशियाला धक्का दिला.
लुब्लियाना येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या रुनी याने ८६व्या मिनिटाला विजयी गोल नोंदवला. त्याच्या या गोलच्या बळावर इंग्लंडने युरो चषक-२०१६ साठीच्या पात्रता फेरीत स्लोवेनियाचा ३-२ने पराभव केला. या रोमांचक सामन्यात मिलिवोजे नोवाकोविचने स्लोवेनियाला ३७व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली होती. जॅक विलशेरे याने
दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल नोंदवून इंग्लंडला
२-१ने आघाडीवर नेले होते.स्लोवेनियाचा बदली खेळाडू युट नेज पेचनिकने ८४व्या मिनिटाला बरोबरी साधली. परंतु, दोन मिनिटांच्या अंतराने रुनीने शानदार प्रदर्शन
करीत गोल नोंदवला आणि संघाला विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)
रुनी विक्रमाकडे...
इंग्लंडच्या रुनीचे ४८ आंतरराष्ट्रीय गोल झाले आहेत. या कामगिरीनंतर त्याने गॅरी लिनेकर याच्याशी बरोबरी साधली आहे. आता इंग्लंडच्या बाबी चार्लटन याच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी तो केवळ
एक पाऊल मागे आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर तो हा विक्रम साधेल, हे निश्चित.