इंग्लंडचे युरोतील स्थान निश्चित

By Admin | Updated: September 7, 2015 00:04 IST2015-09-07T00:04:09+5:302015-09-07T00:04:09+5:30

वेन रुनीने बॉबी चार्लटनच्या इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने सॅन मॅरिनो संघाचा ६-० असा पराभव करताना

England's location in the UK | इंग्लंडचे युरोतील स्थान निश्चित

इंग्लंडचे युरोतील स्थान निश्चित

पॅरिस : वेन रुनीने बॉबी चार्लटनच्या इंग्लंडकडून सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने सॅन मॅरिनो संघाचा ६-० असा पराभव करताना युरो २०१६ फुटबॉल स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
रुनीने सेरेवले येथे झालेल्या या सामन्यात १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यामुळे त्याने १९६६ च्या वर्ल्डकपविजेत्या संघातील सदस्य चार्लटन याच्या १०६ सामन्यांत ४९ गोलच्या विक्रमाची बरोबरी केली. रुनी याने आतापर्यंत १०६ सामने खेळले आहेत. इंग्लंडकडून रुनीशिवाय थियो वॉलकॉटने दोन, तर ख्रिस्तियन ब्रोली, रोस बार्कल आणि हॅरी केन यांनी प्रत्येकी १ गोल केला.इंग्लंड इ गटात अव्वल स्थानी आहे. या गटातील अन्य एका सामन्यात स्वित्झर्लंडने स्लोव्हानियाचा ३-२, तर क गटात विद्यमान युरोपियन चॅम्पियन स्पेनने स्लोव्हाकियाचा २-० असा पराभव केला. युक्रेननेदेखील बेलारुसचा
३-१ असा पराभव करताना युरो २०१६ च्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: England's location in the UK