न्यूझीलंडपुढे आज इंग्लंडचे आव्हान

By Admin | Updated: June 6, 2017 05:09 IST2017-06-06T05:09:41+5:302017-06-06T05:09:41+5:30

यजमान इंग्लंडची आज, मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘अ’ गटात न्यूझीलंडविरुद्ध गाठ पडणार आहे.

England's challenge ahead of New Zealand | न्यूझीलंडपुढे आज इंग्लंडचे आव्हान

न्यूझीलंडपुढे आज इंग्लंडचे आव्हान


कार्डिफ : पहिल्या सामन्यात सहज विजय नोंदविल्यानंतर जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या यजमान इंग्लंडची आज, मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी ‘अ’ गटात न्यूझीलंडविरुद्ध गाठ पडणार आहे.
या लढतीच्या निमित्ताने उभय संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इंग्लंडने विजय मिळवला तर सलग दोन विजयांसह या संघाचा उपांत्य फेरीचा दावा मजबूत होईल, तर न्यूझीलंड संघाची नजर दोन गुण वसूल करण्यावर केंद्रित झाली आहे.
पावसामुळे आॅस्ट्रेलियाविरुद्धची सलामी लढत रद्द झाल्यानंतर न्यूझीलंड संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. इंग्लंडने सलामी लढतीत ३०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा पराभव केला होता. जो रुटने कारकिर्दीतील १० वे शतक झळकावले, तर अ‍ॅलेक्स हेल्सचे शतक केवळ पाच धावांनी हुकले.
दुसऱ्या बाजूचा विचार करता न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत चमकदार कामगिरी करीत रंगत निर्माण केली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: England's challenge ahead of New Zealand