भारतासमोर इंग्लंडचे १८१ धावांचे आव्हान

By Admin | Updated: September 7, 2014 21:36 IST2014-09-07T21:36:15+5:302014-09-07T21:36:15+5:30

फक्त २० षटकांत इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताला १८१ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला

England's 181 against England | भारतासमोर इंग्लंडचे १८१ धावांचे आव्हान

भारतासमोर इंग्लंडचे १८१ धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. ७ - फक्त २० षटकांत इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताला १८१ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकत इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांपैकी मोहम्मद शामीने जॅसन रॉयला फक्त आठ धावांवर बाद केले. तर, इयान मुरगनला ७१ व जो बटलरला १० धावांत बाद केले आहे. रहाणेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत जॅसन रॉय, अ‍ॅलेक्स हिल्स, मोई अली आणि मुरगन यांचे झेल घेतल्याने त्याच्यावर भारतीय प्रेक्षकांनी स्तुतीसुमने उधळली. तर, जो रुट आणि बटलरचा झेल घेतल्याने अंबती रायडूही प्रेक्षकांच्या प्रसंसेचा विषय ठरला. क्रिस वॉक्स व बोपारा हे दोघे नाबाद असतानाच खेळाची पहिली इनिंग संपली. 
 

Web Title: England's 181 against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.