इंग्लंडचा विजयाने निरोप
By Admin | Updated: March 14, 2015 00:15 IST2015-03-14T00:15:44+5:302015-03-14T00:15:44+5:30
बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या इंग्लंडने विश्वकप स्पर्धेत शुक्रवारी पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत अफगाणिस्तानचा

इंग्लंडचा विजयाने निरोप
सिडनी : बाद फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर पडलेल्या इंग्लंडने विश्वकप स्पर्धेत शुक्रवारी पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. उभय संघांसाठी औपचारिकता पूर्ण करणाऱ्या या लढतीत इंग्लंडने सरशी साधत या स्पर्धेतून विजयाने निरोप घेतला. वारंवार पावसाचा व्यत्यय निर्माण झालेल्या या लढतीत अफगाणिस्तान संघाला सूरच गवसला नाही. इंग्लंडने या लढतीत सहज विजयाची नोंद केली.