विजयासह इंग्लंड क्रिकेट विश्वकपमधून बाहेर !
By Admin | Updated: March 13, 2015 17:21 IST2015-03-13T17:21:27+5:302015-03-13T17:21:27+5:30
अफगाणिस्तान संघाचा ९ विकेटने पराभव करीत क्रिकेट विश्वकपमधून इंग्लंड संघाला अलविदा व्हावे लागले.

विजयासह इंग्लंड क्रिकेट विश्वकपमधून बाहेर !
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १३ - अफगाणिस्तान संघाचा ९ विकेटने पराभव करीत क्रिकेट विश्वकपमधून इंग्लंड संघाला अलविदा व्हावे लागले.
क्वार्टर फायनलमध्ये जाण्याआधीच इंग्लंडचा संघ क्रिकेट विश्वचषकातून बाहेर फेकला गेला होता. बांग्लादेशकडून पराभव स्वीकारावा लागणा-या इंग्लंडचा संघ क्वार्टर फायनलमध्ये खेळताना दिसणार नाही. आज झालेल्या अफगाणिस्तानविरुध्द सामन्यात खेळताना इंग्लंड संघाने १ गडी गमावून विजयाचे आव्हान पूर्ण केले. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना ३६.२ षटकात सात गडी गमावून १११ धावा केल्या असतानाच पावसाने हजेरी लावली. पावसामुळे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे २५ षटकात १०१ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवण्यात आले होते. इंग्लंडने हे आव्हान १८.१ षटकात पूर्ण करीत विजय मिळविला. या विजयाबरोरबच इंग्लंड संघाने २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकाला अलविदा केले आहे.