इंग्लंड १३१ धावांनी पराभूत
By Admin | Updated: August 27, 2014 23:05 IST2014-08-27T19:05:55+5:302014-08-27T23:05:32+5:30
इंग्लंडचे सर्व गडी बाद करत भारताने तब्बल १३३ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

इंग्लंड १३१ धावांनी पराभूत
ऑनलाइन लोकमत
सोफिया गार्डन्स (कार्डीफ), दि. २७ - इंग्लंडचे सर्व गडी बाद करत भारताने तब्बल १३३ धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडच्या संघासमोर ३०५ धावांचे आव्हान ठेवले होते. भरतीय गोलंदाजांच्या जोरदारमा-या समोर आज इंग्लंडच्या फलंदाजांचा टिकाव लागणे अशक्य असल्याचे पहिल्या ११ षटकांतच दिसून आले होते. इंग्लंडचा फलंदाज अॅलिस्टर कुक १९ धावांवर तर बेल फक्त एक धावा करत तंबूत परतला. मोहम्मद शामीने या दोघांना बाद करत इंग्लंडच्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीचा धसका घ्यायला लावला.