इंग्लंड फुटबॉल संघ

By Admin | Updated: May 14, 2014 00:09 IST2014-05-13T18:13:13+5:302014-05-14T00:09:20+5:30

फुटबॉल विश्वकपसाठी इंग्लंड संघ जाहीर युवा खेळाडूंना संधी : स्टीवन गेरार्ड संघाचा कर्णधार

England football team | इंग्लंड फुटबॉल संघ

इंग्लंड फुटबॉल संघ

लुटोन : ब्राझीलमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या फुटबॉल विश्वकपसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे़ या संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून संघाचे कर्णधारपद स्टीवन गेरार्ड भूषवणार आहे़
विश्वकपसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातील ६ खेळाडूंना विश्वचषकाचा अनुभव आहे़ इतर खेळाडू पहिल्यांदाच खेळाच्या महाकुंभात आपले नशीब अजमावणार आहेत़ संघात फ्रँक लॅपार्ड हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे़ तो पुढील महिन्यात वयाची ३६ वर्षे पूर्ण करणार आहे़ १८ वर्षीय डिफेंडर ल्यूक शॉ हा इंग्लंड संघातील सर्वांत युवा खेळाडू आहे़
शॉ याने मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले आहे़ या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या इंग्लंड संघात २३ पैकी ११ खेळाडूंनी १० किंवा त्यापेक्षा कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत़ इंग्लंड संघाने प्रशिक्षक राय हडसन म्हणाले, अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश असलेला इंग्लंड संघ स्पर्धेत नक्कीच प्रभावी कामगिरी करील, असा विश्वास आहे़
इंग्लंड संघ :
गोलकीपर : जो हर्ट, फ्रेजर फोरस्टर, बेन फोस्टर, डिफेंडर : लेटन बेन्स, गॅरी काहिल, फिल जागिल्का, ग्लेन जॉनसन, फिल जोन्स, ल्यूक शॉ, ख्रिस स्मालिंग, मिडफील्डर : रॉस बार्कले, स्टीवन गेरार्ड, जॉर्डन हेंडरसन, ॲडम लालाना, फ्रँक लॅपार्ड, जेम्स मिलनेर, ॲलेक्स ऑक्सलेड चेम्बरलेन, रहीम स्टर्लिंग, जॅक विलशेरे फॉरवर्ड : रिकी लेबर्ट, वेन रुनी, डॅनियल स्टरिज, डॅनियल वेलबॅक़

Web Title: England football team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.