प्रेमसंबंधांवरुन इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला ब्लॅकमेल
By Admin | Updated: January 22, 2015 20:54 IST2015-01-22T20:54:41+5:302015-01-22T20:54:41+5:30
इंग्लंडचा वन डे सामन्यांमधील कर्णधार इयॉन मॉर्गनला एका व्यक्तीने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांवरुन ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे.

प्रेमसंबंधांवरुन इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला ब्लॅकमेल
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २२ - इंग्लंडचा वन डे सामन्यांमधील कर्णधार इयॉन मॉर्गनला एका व्यक्तीने पाच वर्षांच्या प्रेमसंबंधांवरुन ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे. मॉर्गनचे पाच वर्षांपूर्वी एका तरुणीशी संबंध होते व या प्रेमसंबंधांची माहिती प्रसारमाध्यमांना देऊ अशी धमकी मॉर्गनला देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेसाठी इंग्लंड संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. काही दिवसांपूर्वी मॉर्गनला एका व्यक्तीने ईमेल पाठवला होता. यामध्ये पाच वर्षांपूर्वी एका तरुणीशी असलेल्या प्रेमसंबंधांची माझ्याकडे इत्यंभूत माहिती आहे. ही माहिती मी युरोप आणि ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांना देईन अशी धमकी देण्यात आली होती. तसेच ही माहिनी प्रसिद्ध होऊ नये यामोबदल्यात त्या व्यक्तीने पाच आकडी रक्कमही मागितली होती अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिका-यांनी दिली. याप्रकरणी संघ व्यवस्थापनाने स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी संबंधीत व्यक्तीला पकडले असून त्याव्यक्तीने या धमकी नाट्याप्रकरणी मॉर्गनची लेखी मागितली आहे असेही अधिका-यांनी सांगितले. सध्या आमचा संघ तिरंगी मालिका आणि विश्वचषकाच्या तयारीत असून आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ देणार नाही असे बोर्डाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.