शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडने न्यूझीलंडला नमविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 04:16 IST

इंग्लंडने विश्वचषक टी-२० स्पर्धेतील आपल्या पहिल्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारताना न्यूझीलंडला ६ विकेटनी नमविले. जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी

मुंबई : इंग्लंडने विश्वचषक टी-२० स्पर्धेतील आपल्या पहिल्या सराव सामन्यात अखेरच्या षटकात बाजी मारताना न्यूझीलंडला ६ विकेटनी नमविले. जेसन रॉय आणि अ‍ॅलेक्स हेल्स या सलामीवीरांनी केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर इंग्लंडने शानदार विजय मिळविला.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ८ बाद १६९ अशी आव्हानात्मक मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १९.२ षटकांत १७० धावा काढल्या. रॉय आणि हेल्स यांनी ८.२ षटकांतच ७७ धावांची वेगवान भागीदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. मिचेल सॅटनरने रॉयला बाद करून ही जोडी फोडली. रॉयने ३६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा कुटल्या. यानंतर हेल्सने आक्रमणाची सूत्रे घेताना संघाला विजयी मार्गावर आणले. हेल्स ३६ चेंडूंत ५ चौकारांसह ४४ धावा काढून बाद झाला. नॅथन मॅक्युलमने हेल्सचा अडसर दूर केल्यानंतर न्यूझीलंडचा डाव ४ बाद १४८ असा घसरला. मात्र, अंतिम क्षणी जोश बटलरने ९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकाराच्या साह्याने नाबाद २४ धावांचा तडाखा देऊन संघाला विजयी केले. सॅनटर आणि मॅक्युलम यांनी प्रत्येकी २ बळी घेऊन इंग्लंडला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. तत्पूर्वी, कर्णधार केन विल्यम्सनने ३९ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह दिलेल्या ६३ धावांच्या आक्रमक तडाख्याच्या जोरावर किवी संघाने ८ बाद १६९ धावांची मजल मारली. विल्यम्सनचा अपवाद वगळता न्यूझीलंडचे इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. फिरकीपटूंपुढे चाचपडत खेळल्याने न्यूझीलंडच्या धावसंख्येला ब्रेक लागला. आदिल रशीद (३/१५) आणि रिसे टोपले (२/३९) यांनी अचूक मारा करताना न्यूझीलंडचा डाव मर्यादित राखला. संक्षिप्त धावफलक :न्यूझीलंड : २० षटकांत ८ बाद १६९ धावा (केन विल्यम्सन ६३, रॉस टेलर नाबाद १९; आदिल रशीद ३/१५, रिस टोपले २/३९) पराभूत वि. इंग्लंड : १९.२ षटकांत ४ बाद १७० धावा (जेसन रॉय ५५, अ‍ॅलेक्स हेल्स ४४; मिचेल सॅनटर २/२४, नॅथन मॅक्युलम २/२५).