काट्याची टक्करदेत इटलीची इंग्लंडवर मात

By Admin | Updated: June 15, 2014 06:08 IST2014-06-15T05:44:32+5:302014-06-15T06:08:15+5:30

2-१ अशा फरकाने इटलीने सामना जिंकला . इंग्लंड विरुद्ध इटली हा अतिशय अटितटीचा सामना बघण्यासाठी दोन्ही देशांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती

England beat England by a bitter fight | काट्याची टक्करदेत इटलीची इंग्लंडवर मात

काट्याची टक्करदेत इटलीची इंग्लंडवर मात

ऑनलाइन टीम
मॅनोस, दि. १५ - २-१ अशा फरकाने इटलीने सामना जिंकला . इंग्लंड विरुद्ध इटली हा अतिशय अटितटीचा सामना बघण्यासाठी दोन्ही देशांच्या समर्थकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. फिफा च्या क्रमवारीनुसार इटली नवव्या स्थानावर व इंग्लंड १० व्या स्थानावर आहे. इटलीच्या मार्केचिओ ने ३५ व्या मिनिटाला पहिला गोल करत प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. या घटनेने इंग्लंडच्या प्रेक्षकांवर दडपण आले होते. म्हणूनच इंग्लंडच्या स्टरडिगनेही फक्त दोनच मिनिटांच्या फरकाने लगोलग दुसरा गोल करत आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले आणि इंग्लंडच्या प्रेक्षकांची दाद मिळवली. पुढे अनेक प्रयत्न करूनही इंग्लंडला गोल करता आला नाहीच परंतू आपल्या गोलपोस्ट पर्यंत इटालीयन खेळाडू चेंडू खेळवू शकणार नाहीत याचीही त्यांनी खबरदारी घेतली. तरीही पहिल्या दोन गोल मुळे सामना इटलीच्या खिशात गेल्याने इंग्रज प्रेक्षकांची घोर निराशा झाली. यापूर्वीही युरोकपमध्ये इटलीने इंग्लंडला धुळ चारत आपणच श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले होते.

Web Title: England beat England by a bitter fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.