इंग्लंडचा अफगाणिस्तानवर १५ धावांनी विजय
By Admin | Updated: March 23, 2016 18:36 IST2016-03-23T18:31:50+5:302016-03-23T18:36:33+5:30
टी-२० वर्ल्डकपमधील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने १५ धावांनी विजय मिऴविला. या सामन्यात इंग्लडने २० षटकात सात बाद १४२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची

इंग्लंडचा अफगाणिस्तानवर १५ धावांनी विजय
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि.२३ - टी-२० वर्ल्डकपमधील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने १५ धावांनी विजय मिऴविला. या सामन्यात इंग्लडने २० षटकात सात बाद १४२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातीलाच फलंदाजी खराब झाली. त्यानंतर मधल्या फळीने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने २० षटकात नऊ बाद १२७ धावा केल्या.
इंग्लंडचा फलंदाज मोईम अलीने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा कुटल्या. त्याने सहा षटकार आणि चार चौकार लगावत नाबाद ४१ धावा केल्या. तर डेव्हिड विले नाबाद २० धावा केल्या. फलंदाज जेम्स व्हेन्सी (२२), ज्यो रुट (१२), ख्रिस जॉर्डनने १५ धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून फलंदाज शफीक्युल्लाने जास्त धावा काढल्या. त्याने नाबाद ३५ धावा केल्या. तर नुर अली जार्डन (१७), रशीद खान (१५), मोहम्मद नबी (१२) आणि शेनवरीने २० धावा केल्या.