इंग्लंड-आॅस्ट्रेलिया तिसरी अ‍ॅशेज लढत आजपासून

By Admin | Updated: July 29, 2015 02:35 IST2015-07-29T02:35:44+5:302015-07-29T02:35:44+5:30

दुसऱ्या कसोटी सामन्यातील लाजिरवाणा पराभव विसरुन यजमान इंग्लंड संघ अ‍ॅशेज मालिकेतील बुधवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी कसोटी

England-Australia third Ashes fight today | इंग्लंड-आॅस्ट्रेलिया तिसरी अ‍ॅशेज लढत आजपासून

इंग्लंड-आॅस्ट्रेलिया तिसरी अ‍ॅशेज लढत आजपासून

बर्मिंघम : दुसऱ्या कसोटी सामन्यातील लाजिरवाणा पराभव विसरुन यजमान इंग्लंड संघ अ‍ॅशेज मालिकेतील बुधवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. मिशेल जॉन्सनच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी संघाचा वेगवान मारा खेळण्यास सज्ज असल्याचे इंग्लंडचा खेळाडू जो रुटने स्पष्ट केले.
आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने २०१३-१४ च्या अ‍ॅशेस मालिकेत ३७ बळी घेतले होते. त्यात आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा ५-० ने सफाया केला होता. जॉन्सनला आता खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात एकही बळी घेतला आला नाही. त्यात आॅस्ट्रेलियाला १६९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉन्सनने ८० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. या कसोटीत आॅस्ट्रेलियाने ४०५ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कच्या तुलनेत चांगल्या फॉर्मात आहे, पण तरी इंग्लंडचा दुसरा डाव १०३ धावांत संपुष्टात आला. जॉन्सनबाबत बोलताना रुट म्हणाला, ‘केवळ एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करणे चुकीचे आहे.
कार्डिफमध्ये त्याला केवळ दोन बळी मिळले होते. त्यामुळे त्याच्यावर दडपण निर्माण करणे आवश्यक आहे.’ इंग्लंडने गॅरी बॅलन्सला वगळत
तिसऱ्या क्रमांकासाठी इयान
बेलला पंसती दर्शवली आहे
तर बॅलन्सच्या साथी जॉन
बेयरस्टाचा संघात समावेश करण्यात आलाा आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: England-Australia third Ashes fight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.