इंग्लंड
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:07+5:302015-02-10T00:56:07+5:30
विश्वकप सराव : ख्रिस व्होक्सचा भेदक मारा

इंग्लंड
व श्वकप सराव : ख्रिस व्होक्सचा भेदक माराइंग्लंडचा विंडीजविरुद्ध दमदार विजयसिडनी : वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या अचूक मार्याच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव माफक धावसंख्येत गुंडाळणार्या इंग्लंडने विश्वकप सराव सामन्यात सोमवारी जवळजवळ २७ षटके शिल्लक राखून ९ गड्यांनी विजय मिळविला. नाणेफेकीचा कौल वगळता या लढतीत वेस्ट इंडीज संघासाठी काहीच मनासारखे घडले नाही. व्होक्सने १९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत विंडीजचा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. विंडीजचा डाव २९.३ षटकांत १२२ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने २२.५ षटकांत एक गडी गमावत सहज विजय मिळविला.नवा कर्णधार व काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत विश्वकप स्पर्धेसाठी येथे दाखल झालेल्या विंडीज संघातील फलंदाजांना वेगवान व उसळी घेणार्या खेळपीवर ताळमेळ साधता आला नाही. दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणार्या विंडीज संघातील केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यात लेंडल सिमन्सने सर्वाधिक ४५ धावा फटकाविल्या. याव्यतिरिक्त ड्वेन स्मिथ (२१), डॅरेन सॅमी (१२) आणि मर्लोन सॅम्युअल्स (१०) यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. इंग्लंडतर्फे व्होक्सव्यतिरिक्त स्टिव्हन फिनने ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. ख्रिस जॉर्डन, जेम्स ट्रेडवेल व रवी बोपारा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. इंग्लंडने प्रमुख गोलंदाज जेम्स ॲन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांना गोलंदाजी दिली नाही. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोईन अलीने (४३ चेंडू, ४६ धावा, ९ चौकार) आक्रमक खेळी केली. मोईन अली बाद झाल्यानंतर इयान बेल (३५) आणि जेम्स टेलर (२५) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. विंडीजतर्फे एकमेव बळी केमार रोचने घेतला. इंग्लंडला आता ११ फेब्रुवारी रोजी याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध, तर विंडीजला त्यानंतरच्या दिवशी स्कॉटलंडविरुद्ध सराव सामना खेळावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)