अभियांत्रिकी कप क्रिकेट सामने
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:52+5:302015-02-11T23:19:52+5:30
एलआयटी संघ उपांत्य फेरीत

अभियांत्रिकी कप क्रिकेट सामने
ए आयटी संघ उपांत्य फेरीत इंजिनीअर्स चषक क्रिकेट स्पर्धानागपर: रातुम नागपूर विद्यापीठाच्या लक्ष्मीनारायण इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) संघाने दुसरा विजय नोंदवीत बुधवारी १५ व्या इंजिनीअर्स चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रुबी क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात एलआयटीने नाणेफेक जिंकून फलंदाजीला आमंत्रित केलेल्या एस. बी. जैन इन्स्टट्यिूटने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून ९० धावा केल्या. आकाश वैरागडेने ३१, अजय शुक्लाने ११ आणि अंकित बालांडेने १६ धावा केल्या. एलआयटीच्या मोहित जैनने ३, शुभम जोशीने २ गडी बाद केले. विजयाचे लक्ष्य एलआयटीने ५ गडी गमावून पूर्ण करीत ५ गड्यांनी विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. एलआयटीच्या हरिशंकरने नाबाद ३३, हितेश कातोळेने ३९ धावा केल्या. शुभम भुसारीने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट (आयटीएम) आणि राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (आरजीसीई) यांच्यातील सामना मंगळवारच्या रात्री झालेल्या पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे उभय संघाला प्रत्येकी २ गुण देण्यात आले.(क्रीडा प्रतिनिधी)