भारताचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: September 27, 2014 02:41 IST2014-09-27T02:41:07+5:302014-09-27T02:41:07+5:30

भारताच्या सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप व श्रीकांत किदम्बी यांना पराभव स्वीकारावा लागला

Ending the Challenge of India | भारताचे आव्हान संपुष्टात

भारताचे आव्हान संपुष्टात

भारताच्या सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप व श्रीकांत किदम्बी यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कश्यपला पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चोंग वेईविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत २-० ने पराभव स्वीकारावा लागला. सायनाला उपांत्यपूर्व फेरीत चीनची भिंत भेदण्यात अपयश आले. चीनच्या यिहान वांगविरुद्ध सायनाला २१-१८, ९-२१, ७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत के. श्रीकांतला दक्षिण कोरियाच्या व्हान्हो सोनविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत बी. सुमित रेड्डी व मनू अत्री यांना उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरच्या डॅनी बावा ख्रिसनांटा व यू यान व्हेसिना नियो यांच्याविरुद्ध १८-२१, २३-२१, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. पुरुष दुहेरीमध्ये अत्री व सुमित रेड्डी यांचा इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान व हेंड्रा सेतियावान यांनी २१-१२, २१-१९ ने पराभव केला.

Web Title: Ending the Challenge of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.