सोमदेवचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: July 30, 2015 00:43 IST2015-07-30T00:43:18+5:302015-07-30T00:43:18+5:30
भारताच्या सोमदेव देववर्मनचे एटीपी अटलांटा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत अमेरिकेचा क्व्लॉलिफायर जारेड डोनाल्डसनकडून पराभव पत्करल्यामुळे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टत आले.

सोमदेवचे आव्हान संपुष्टात
नवी दिल्ली: भारताच्या सोमदेव देववर्मनचे एटीपी अटलांटा ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत अमेरिकेचा क्व्लॉलिफायर जारेड डोनाल्डसनकडून पराभव पत्करल्यामुळे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टत आले.
तीस वर्षीय सोमदेवने या स्पर्धेत क्व्लॉलिफायरद्वारे या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला होता. त्याला १८ वर्षीय डोनाल्डसनने सरळ दोन सेटमध्ये ३-६, ४-६ असे नमविले. दुसरीकडे, भारताच्या पुरव राजा आपला दुहेरीचा जोडीदार फ्रान्सच्या फेब्रस मार्टिनसह खेळणार आहे. त्याचा दुहेरीचा सामना ट्रे हुए आणि स्टीव्ह जॉनसन जोडीविरुद्ध होईल. (वृत्तसंस्था)