इंग्लंडचा विजयी शेवट

By Admin | Updated: September 6, 2014 03:07 IST2014-09-06T03:07:56+5:302014-09-06T03:07:56+5:30

यजमान इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शुक्रवारी 41 धावांनी विजयाचे खाते उघडताना पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताचा विजय 3-1 असा मर्यादित ठेवला.

End of England's Victory | इंग्लंडचा विजयी शेवट

इंग्लंडचा विजयी शेवट

पाचवी वन डे : भारत 41 धावांनी पराभूत; मालिका 3-1 ने जिंकली
लीड्स : यजमान इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शुक्रवारी 41 धावांनी विजयाचे खाते उघडताना पाच सामन्यांच्या मालिकेतील भारताचा विजय 3-1 असा मर्यादित ठेवला. पहिला सामना पावसात वाहून गेल्यानंतर ओळीने तिन्ही सामने जिंकणा:या भारताला ‘क्लीन स्वीप’ची संधी होती; पण इंग्लंडने 5क् षटकांत काढलेल्या 7 बाद 294 धावांचा पाठलाग करताना भारताची 48.4 षटकांत सर्व बाद 253 अशी दाणादाण उडाली. ज्यो रुटचे (113 धावा) शतक हे सामन्याचे वैशिष्टय़ ठरले.
एकाकी संघर्ष करणारा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने गोलंदाजीतील अपयश धुवून काढण्याचा प्रय} करीत सर्वाधिक 87 धावा केल्या. तो दहाव्या स्थानावर बाद झाला. अंबाती रायुडू याने 53, तर धोनीने 29 धावा केल्या. सुरेश रैना 18 धावा काढून परतला. आघाडीचे तिन्ही फलंदाज 49 धावांवर बाद झाले होते. चौथ्या सामन्यातील शतकवीर अजिंक्य रहाणो भोपळा न फोडताच बाद झाला. विराट कोहली 13 आणि शिखर धवन 31 हेदेखील फार काळ स्थिरावू शकले नाहीत. रायुडूने 65 चेंडूंवर तीन चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावा केल्या. जडेजाने नऊ गडी बाद झाल्यानंतरही प्रतिकार करून षटकार- चौकार मारले; पण दुस:या टोकाला कुणी नसल्याने संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. सवश्रेष्ठ खेळीत जडेजाने 68 चेंडूंवर नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 87 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 47 धावांत तीन, अँडरसनने 39 धावांत दोन, स्टीव्हन फिनने 37 धावांत दोन आणि मोईन अलीने 34 धावांत दोन  गडी बाद केले. 
तत्पूर्वी, धोनीने नाणोफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित करताच यजमानांची पडझड झाली. अॅलेक्स हेल्स (4) याला उमेशने टिपले. मागच्या सामन्यात जलद अर्धशतक ठोकणारा मोईन अलीला बढती मिळाली होती; पण तो केवळ 
नऊ धावा काढून ङोलबाद झाला. कूक-रुट यांनी तिस:या गडय़ासाठी 
52 धावा करीत डाव सावरला. रुटने 1क्8 चेंडू टोलवित दहा चौकार आणि तीन षटकारांच्या साह्यने 113 धावांचे योगदान दिले. गेल्या चार सामन्यांत यजमान संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. रुटने यष्टिरक्षक- फलंदाज जोस बटलरसोबत (49) पाचव्या गडय़ासाठी केवळ 71 चेंडूंवर 1क्8 धावांची भागीदारी केली. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार अॅलिस्टर कूकने 46 आणि बेन स्टोक्सने नाबाद 33 धावांची भर घातली. भारताकडून मोहम्मद शमी यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 52 धावांत दोन तसेच भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, अश्विन आणि रैना यांनी एकेक गडी बाद केला. रवींद्र जडेजा अपयशी ठरला. त्याने 9 षटकांत 66 धावा दिल्या; पण गडी बाद करता आला नाही. (वृत्तसंस्था)
 
विश्वचषक जवळ येत आहे आणि आम्हाला सकारात्मक 
रहावे लागणार आहे.आम्हाला आमच्या खेळात अधिक सुधारणा करावी लागणार आहे. दूरदर्शनवर मी कसोटी सामने पाहिले होते. मी माझी तंदुरूस्ती आणि एकाग्रतेवर मेहनत घेतली आहे. एकदिवसीय संघात आत्मविश्वास भरपूर होता. 
- सुरेश रैना, मालिकावीर 
 
4अंबाती रायुडूने 65 चेंडूंवर तीन चौकार आणि दोन षटकारांसह 53 धावा केल्या. 
4सवश्रेष्ठ खेळीत जडेजाने 68 चेंडूंवर नऊ चौकार आणि दोन षटकारांसह 87 धावांचे योगदान दिले. 
 
इंग्लंड: अॅलेस्टर कूक ङो. धोनी गो. रैना 46, अॅलेक्स हेल्स ङो. रैना गो. यादव 4, मोईन अली ङो. यादव गो. भुवनेश्वर 9, ज्यो रुट ङो. अश्विन गो. शमी 113, इयोन मोर्गन यष्टिचित गो. अश्विन 14, जोस बटलर धावबाद 49, बेन स्टोक्स नाबाद 33, ािस वोक्स त्रि. गो. शमी 9, जेम्स ट्रेडवेल नाबाद 8, अवांतर: 9, एकूण: 5क् षटकांत 7 बाद 294 धावा.  गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 8-क्-45-1, उमेश यादव 6-क्-46-1, मोहम्मद शमी 1क्-क्-52-2, रविचंद्रन अश्विन 1क्-2-49-1, सुरेश रैना 7-क्-32-1, रवींद्र जडेजा 9-क्-66-क्. 
भारत : अजिंक्य रहाणो ङो. मोर्गन गो. अँडरसन क्, शिखर धवन त्रि. गो. अली 31, विराट कोहली ङो. कुक गो. अँडरसन 13, अंबाती रायुडू ङो. कुक गो. स्टोक्स 53, सुरेश रैना ङो. बटलर गो. अली 18, महेंद्रसिंह धोनी ङो. स्टोक्स 
गो. फिन 29, रवींद्र जडेजा त्रि. गो. फिन 87, आश्विन ङो. फिन गो. स्टोक्स 16, भुवनेश्वर कुमार धावबाद 1, मोहंमद शमी ङो. हेल्स गो. स्टोक्स क्, 
उमेश यादव नाबाद क्, अवांतर 5, एकूण : 48.4 षटकांत सर्व बाद 253 
धावा. गोलंदाजी : जेम्स अँडरसन 9-क्-34-2, ािस ओक्स 1क्-1-61-क्, मोईन अली 8-क्-34-2, स्टीव्हन फिन 8.4-1-37-2, जेम्स ट्रेडवेल 5-क्-35-क्, बेस स्टोक्स 7-क्-47-3.
 

 

Web Title: End of England's Victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.