बंगाल, कर्नाटक संघटनेची निवडणूक स्थगित
By Admin | Updated: July 21, 2016 06:02 IST2016-07-21T06:02:04+5:302016-07-21T06:02:04+5:30
बीसीसीआयमध्ये मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या. लोढा समितीने बीसीसीआयला बंगाल तसेच कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले.

बंगाल, कर्नाटक संघटनेची निवडणूक स्थगित
नवी दिल्ली : बीसीसीआयमध्ये मूलभूत सुधारणा घडवून आणण्यासाठी नेमण्यात आलेल्या न्या. लोढा समितीने बीसीसीआयला बंगाल तसेच कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. सोमवारी सुप्रीम कोर्टाने लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणण्यासाठी बोर्डाला ६ महिन्यांचा कालावधी दिला आहे.
बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, सचिव अजय शिर्के, कोशाध्यक्षा अनिरुद्ध चौधरी आणि संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांसाठी हे निर्देश बंधनकारक आहेत. बीसीसीआयने राज्य संघटनेची निवडणूक सध्या घेऊ नये, असे निर्देशात म्हटले होते. यानुसार ३१ जुलै रोजी होणारी बंगाल क्रिकेट संघटना आणि कर्नाटक क्रिकेट संघटनेची निवडणूक स्थगित करण्यात आली. काल झालेली जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेची निवडणूकदेखील
रद्द ठरणार आहे. अध्यक्षपदी राज्याचे मंत्री इम्रान रझा अन्सारी हे निर्वाचित झाले होते. (वृत्तसंस्था)