स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: July 17, 2017 00:29 IST2017-07-17T00:29:55+5:302017-07-17T00:29:55+5:30

सेनेगल फुटबॉल लीग चषक अंतिम फेरीदरम्यान दोन्ही संघांतील पाठीराख्यांतील भांडणानंतर निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत आठ

Eight die of stampede in stadium | स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू

स्टेडियममध्ये चेंगराचेंगरीत आठ जणांचा मृत्यू

डकार : सेनेगल फुटबॉल लीग चषक अंतिम फेरीदरम्यान दोन्ही संघांतील पाठीराख्यांतील भांडणानंतर निर्माण झालेल्या चेंगराचेंगरीत आठ जणांना मृत्यूला सामोरे जावे लागले. यात ४९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
यूएस ओकोम आणि स्टेड डि मबोर या दोन संघांतील अंतिम फेरीदरम्यान प्रेक्षकांनी स्टेडियम गच्च भरले होते. अतिरिक्त वेळेत जेव्हा २-१ अशी स्थिती होती तेव्हा यूएस ओकामच्या पाठीराख्यांनी स्टेड डि मबोरच्या चाहत्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रेक्षक स्टेडियमबाहेर निघाले. त्यातच एक भिंतही कोसळली. पोलिसांनी अश्रुधूर सोडल्यानंतर तर स्टेडियममध्ये अफरातफरीचे वातावरण बनले.
या घटनेचा साक्षीदार असणारा शेख मबा डियोप म्हणाला, ‘अचानक भिंत कोसळली व तीही लोकांवर. त्यामुळे आमच्या नजीक असणाऱ्या कोणीतरी जीव गमावला असेल हे आम्हाला माहीत होते.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Eight die of stampede in stadium