‘मालिकेत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न’
By Admin | Updated: August 29, 2014 01:33 IST2014-08-29T01:33:08+5:302014-08-29T01:33:08+5:30
इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत विजयी सुरुवात केल्यामुळे टीम इंडियाचे मनोधैर्य उंचावलेले आहे.

‘मालिकेत वर्चस्व राखण्याचा प्रयत्न’
कार्डिफ : इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेत विजयी सुरुवात केल्यामुळे टीम इंडियाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. दुसऱ्या वन-डेतील विजयानंतर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या देहबोलीवरून त्याची प्रचिती आली. मालिकेत यानंतर होणाऱ्या लढतींमध्ये वर्चस्व राखण्यास प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली.
धोनी म्हणाला, ‘‘उर्वरित तीन सामन्यांमध्ये भारतीय संघ यजमान इंग्लंड संघाविरुद्ध वर्चस्व गाजवेल, अशी आशा आहे. नेहमीच मोठ्या फरकाने विजय मिळविणे शक्य नसते. प्रत्येक लढतीत एकसारखा खेळ करणे शक्य नाही. सूर गवसण्यासाठी वन-डे क्रिकेट सर्वोत्तम आहे.’’
धोनी पुढे म्हणाला, ‘‘सुरुवात नेहमीच महत्त्वाची असते. विजयाने सुरुवात केली, तर मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. (वृत्तसंस्था)