द्विवेदी-चावला यांनी दमवले

By Admin | Updated: November 10, 2015 02:03 IST2015-11-10T02:03:29+5:302015-11-10T02:03:29+5:30

एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी

Dwivedi-Chawla reprimanded | द्विवेदी-चावला यांनी दमवले

द्विवेदी-चावला यांनी दमवले

मुंबई : एकलव्य द्विवेदी आणि पीयूष चावला यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर उत्तर प्रदेशने बलाढ्य मुंबई विरुद्ध रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद ३५० धावांची मजल मारली. मुंबईने उभारलेल्या ६१० धावांचा पाठलाग करणारा उत्तर प्रदेश संघ २६० धावांनी पिछाडीवर असून, फॉलोआॅन टाळण्यासाठी त्यांना अजूनही १११ धावांची गरज आहे, तसेच एकूणच फलंदाजांचे वर्चस्व राहिलेला हा सामना अनिर्णितकडे झुकला असून, मंगळवारी मुंबईकर उत्तर प्रदेशवर फॉलोआॅन देण्याचा जोरदार प्रयत्न करतील.
वानेखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशने बिनबाद ५१ या धावसंख्येवरून खेळण्यास सुरुवात केली. तन्मय श्रीवास्तव बलविंदर संधूच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्यानंतर हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांनी ९२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. अर्धशतक झळकावल्यानंतर शर्मा लगेच धावबाद होऊन परतला. यानंतर आलेल्या कर्णधार सुरेश रैनावर सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, अवघ्या ९ धावा काढून तो दाभोळकरचा शिकार ठरला. यानंतर असनोराही सर्वाधिक ९२ धावा काढून बाद झाला. यावेळी मुंबईकर वर्चस्व गाजवणार असे दिसत असताना, सरफराज खान या ‘माजी मुंबईकर’ने आपल्या जुन्या सहकाऱ्यांना चोप देण्यास सुरुवात केली. खेळपट्टी व प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या माहितीचा फायदा घेत, सरफराजने ४ चौकार व २ षटकार खेचत ५१ चेंडूत ४४ धाव फटकावल्या. अभिषेक नायरने त्याला पायचीत करुन मुंबईतील अडसर दूर केला. ५ बाद २४६ अशा अडचणीत असलेल्या उत्तर प्रदेशला मुंबईकर किती धावांत गुंडाळणार अशी उत्सुकता असताना द्विवेदी आणि चावला यांनी मुंबईकरांना यानंतर यश मिळवून दिले नाही.
या दोघांनीही शानदार नाबाद अर्धशतकी खेळी करून सहाव्या विकेटसाठी नाबाद १०४ धावांची भागीदारी केली. द्विवेदी ८८ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ५० धावांवर, तर चावला ५५ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह ५४ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे. मुंबईकडून अष्टपैलू अभिषेक नायरने ३७ धावांत २ बळी घेतले असून, विशाल दाभोळकर आणि बलविंदर संधू यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावा
उत्तर प्रदेश (पहिला डाव) : तन्मय श्रीवास्तव त्रि. गो. संधू ३७, हिमांशू असनोरा त्रि. गो. नायर ९२, उमंग शर्मा धावबाद (कुलकर्णी) ५३, सुरेश रैना यष्टिचित तरे गो. दाभोळकर ९, सरफराज खान पायचीत गो. नायर ४४, एकलव्य द्विवेदी खेळत आहे ५०, पीयूष चावला खेळत आहे ५४. अवांतर - ११. एकूण : ११७ षटकांत ५ बाद ३५० धावा.
गोलंदाजी : विशाल दाभोळकर २६-६-१००-१, शार्दुल ठाकूर १७-३-५१-०; धवल कुलकर्णी १९-५-५५-०; बलविंदर संधू २४-७-५४-१; अभिषेक नायर १८-५-३७-२, रोहित शर्मा १३-३-४३-०

Web Title: Dwivedi-Chawla reprimanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.