मदनलालचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: October 8, 2015 04:12 IST2015-10-08T04:12:12+5:302015-10-08T04:12:12+5:30
भारताचा मुष्टियुद्धपटू मदनलालला विश्व मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत चांगली सुरुवात करूनसुद्धा ५२ किलो वजन गटात पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला.

मदनलालचे आव्हान संपुष्टात
दोहा : भारताचा मुष्टियुद्धपटू मदनलालला विश्व मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत चांगली सुरुवात करूनसुद्धा ५२ किलो वजन गटात पहिल्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. राष्ट्रीय विजेता मदनलाल इटलीच्या विनसेंजो पिकार्डीकडून ०-३ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताकडून बुधवारी फक्त मदनलालच रिंगमध्ये उतरला. आतापर्यंत या स्पर्धेत भारताकडून शिव थापा ९५६ किलो गट), विकास कृष्ण (७५ किलो) हे दोघेच दुसऱ्या फेरीत पोहोचले आहे. (वृत्तसंस्था)