झोपेमुळे मुकले आंतरराष्ट्रीय कसोटीतील पदार्पण
By Admin | Updated: October 14, 2015 11:13 IST2015-10-14T10:44:30+5:302015-10-14T11:13:08+5:30
झोपाळूपणा किती महागात पडू शकतो याचा अनुभवर पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज झफर गौहरला येत आहे.

झोपेमुळे मुकले आंतरराष्ट्रीय कसोटीतील पदार्पण
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. १४ - झोपाळूपणा किती महागात पडू शकतो याचा अनुभवर पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज झफर गौहरला येत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झोपेमुळेच झफरने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी गमावली आहे.
पाकिस्तान व इंग्लंड यांच्यात सध्या अबूधाबी येथे कसोटी मालिका सुरु असून या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज यासिर शाह याच्या पाठिला दुखापत झाली होती. त्यामुळे पाक बोर्डाने शाहऐवजी झफर गौहरचा संघात समावेश केला होता. सामना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी रात्री झफरच्या व्हिसाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती. रात्री उशीराच्या फ्लाईटने झफर अबूधाबीला येणे अपेक्षीत होते. संघ व्यवस्थापनाने रात्री झफरला वारंवार फोन केला. मात्र त्याने फोनला प्रतिसादच दिला. झफर हा झोपला असल्याने त्याने फोनला प्रतिसाद दिला नाही असे दुस-या दिवशी सकाळी स्पष्ट झाले. पण या झोपेमुळे झफरने आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करण्याची संधी गमावली.