भारताची थाळीफेकपटू सीमा पुनियाचे आव्हान संपुष्टात

By Admin | Updated: August 16, 2016 09:00 IST2016-08-16T08:47:46+5:302016-08-16T09:00:24+5:30

भारताची अव्वल महिला थाळीफेकपटू सीमा पुनिया अंतिल थाळीफेकीची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली.

Due to the challenge of India's throwaway range Punia, | भारताची थाळीफेकपटू सीमा पुनियाचे आव्हान संपुष्टात

भारताची थाळीफेकपटू सीमा पुनियाचे आव्हान संपुष्टात

ऑनलाइन लोकमत 

रिओ, दि. १६ - भारताची अव्वल महिला थाळीफेकपटू सीमा पुनिया अंतिल थाळीफेकीची अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरली. पात्रता फेरीतच सीमाचे आव्हान संपुष्टात आले. सीमाने पहिल्या प्रयत्नात ५७.५८ मीटर अंतरावर थाळीफेक केली.
 
६२.०० मीटर अंतरावर थाळीफेकणा-या स्पर्धकाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. पहिल्या बाराजणांना अंतिम फेरीत स्थान मिळणार होते. सीमा तिच्या गटात नववी आणि सर्व स्पर्धकांमध्ये वीसाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. 

Web Title: Due to the challenge of India's throwaway range Punia,