यजमान मुंबई उपनगरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: March 15, 2015 01:38 IST2015-03-15T01:38:18+5:302015-03-15T01:38:18+5:30
३१व्या किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान मुंबई उपनगरचे आव्हान संपुष्टात आले. तर गतविजेत्या ठाण्याने उपांत्यपुर्व फेरी गाठली.

यजमान मुंबई उपनगरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
मुंबई: मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र खो-खो संघटना आणि मुंबई उपनगर खो-खो संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरु असलेल्या ३१व्या किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान मुंबई उपनगरचे आव्हान संपुष्टात आले. तर गतविजेत्या ठाण्याने उपांत्यपुर्व फेरी गाठली.
मुलुंड येथील संभाजी मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेत किशोर गटाच्या उप-उपांत्यपुर्व फेरी फेरीमध्ये मुंबई उपनगरला नाशिक विरुध्द १४-२० असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला. मध्यंतराला नाशिकने ६-५ अशी नाममात्र आघाडी घेत नियंत्रण राखले. दुसऱ्या सत्रात नाशिककरांनी आक्रमक खेळ करताना यजमानांना पराभवाचा धक्का दिला. ठाण्याने आपला लौकिकानुसार आक्रमक खेळ करताना साताराला १३-७ असे १ डाव व ६ गुणांनी लोळवले. याच गटातील अन्य एका सामन्यात मुंबईला अहमदनगर विरुध्द अवघ्या २ गुणांची १२-१४ असा पराभव पत्करावा लागला.
किशोरींमध्ये पुण्याने मुंबईला ६-५ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)