विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचे आदेश

By Admin | Updated: August 29, 2015 02:42 IST2015-08-29T00:57:18+5:302015-08-29T02:42:27+5:30

कुस्तीचे माजी मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक राहीलेले विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले. द्रोणाचार्य पुरस्कार निवड

Dronacharya award for Vinod Kumar | विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचे आदेश

विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचे आदेश

नवी दिल्ली : कुस्तीचे माजी मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक राहीलेले विनोद कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आदेश दिले. द्रोणाचार्य पुरस्कार निवड समितीकडून आपली उपेक्षा झाल्याचे कारण
देत दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने स्वीकारल्यानंतर हे आदेश दिले. समितीने अनुपकुमारसिंग दहिया यांच्या नावाची शिफारस केली होती.
न्या. व्ही. पी. वैश्य म्हणाले, ‘पुरस्कार याचिकाकर्ते विनोद कुमार यांना मिळायला हवा. पुरस्कार सोहळा शनिवारी राष्ट्रपती भवनात होणार आहे. विनोद हे नोव्हेंबर २०१० ते एप्रिल २०१५ या कालावधीत राष्ट्रीय पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत माझ्या शिष्यांनी केलेल्या कामगिरीमुळे अनुप यांच्या पेक्षा माझे गूण अधिक होतात असा त्यांचा दावा होता. २०१२ साली ध्यानचंद पुरस्कार मिळाल्यामुळे समितीने माझे नाव मागे टाकले असा त्यांनी दावा केला. ध्यानचंद पुरस्काराचा द्रोणाचार्य पुरस्काराशी संबंध नसल्याचा त्यांचा दावा आहे. यापूर्वी देखील अनेकांना अर्जून आणि द्रोणाचार्य हे दोन्ही पुरस्कार देण्यात आले आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार हा केवळ कोचेससाठी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Dronacharya award for Vinod Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.