डीआरएम चॅलेंज क्रिकेट
By Admin | Updated: January 30, 2015 00:54 IST2015-01-30T00:54:08+5:302015-01-30T00:54:08+5:30
मध्य रेल्वे डीआरएम चॅलेंज क्रिकेट

डीआरएम चॅलेंज क्रिकेट
म ्य रेल्वे डीआरएम चॅलेंज क्रिकेटएसक्यूटी संघाला डीआरएम चषकनागपूर : एसक्यूटी संघाने कमर्शियल संघाला दहा गड्यांनी सहज पराभूत करीत २० व्या मध्य रेल्वे डीआरएम चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावले.अजनी मैदानावर गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात एसक्यूटीने कमर्शियलला २० षटकांत ८ बाद ११२ धावांत रोखल्यानंतर एकही गडी न गमावता लक्ष्य सहज गाठले. नितीन अहिरराव याने दोन षटकार आणि आठ चौकारांसह ६७ धावा केल्या. राहुल जाधव याने ३७ धावांचे योगदान दिले. अहिरराव सामनावीर ठरला. पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुख्य पाहुणे डीआरएम ओ. पी. सिंग हे होते. यावेळी क्रीडा अधिकारी गौतम जैन, सुखविंदर सिद्धू, मनोज कुमार, के. फारुकी, हबीब खान, विनोद चतुर्वेदी, नितीन समर्थ , दीपक वझलवार, प्रबोधन जनबंधू, प्रशांत कानतोडे, प्रवीण लोंढासे आदी उपस्थित होते. विजेत्या संघाला २१ हजार रोख व चषक आणि उपविजेत्या संघाला १५ हजार रोख व चषक देण्यात आला.स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज विनय यादव, गोलंदाज जे. भगत, अष्टपैलू खेळाडू सुधीर पेंदाम, क्षेत्ररक्षक भारत चंदेल, यष्टिरक्षक आणि स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू राहुल जाधव यांना वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.(क्रीडा प्रतिनिधी).......................................................नॅशनल गेम्ससाठी पाच हॅण्डबॉलपटूंची निवडनागपूर : केरळमध्ये आगामी ३१ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या नॅशनल गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला हॅण्डबॉल संघात नागपूरच्या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात प्राजक्ता भगत, पुनम कडव, प्राची खराबे, मेघा शेंडे आणि समीक्षा इटनकर यांचा समावेश आहे. या पाचही खेळाडू फ्रेन्ड्स क्लबच्या सदस्य असून दादोजी कोंडदेव पुरस्कारप्राप्त सीताराम भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात यशवंत स्टेडियम येथे सराव करतात.(क्रीडा प्रतिनिधी).......................................................