कन्या जीवासोबत मौजमस्तीत रंगला धोनी

By Admin | Updated: February 16, 2017 00:08 IST2017-02-16T00:08:27+5:302017-02-16T00:08:27+5:30

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कन्या जीवासोबत सध्या चर्चेत आहे. कसोटीतून निवृत्त झालेल्या माहीने फावल्या वेळेचा

Dressed up with a girl, | कन्या जीवासोबत मौजमस्तीत रंगला धोनी

कन्या जीवासोबत मौजमस्तीत रंगला धोनी

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी कन्या जीवासोबत सध्या चर्चेत आहे. कसोटीतून निवृत्त झालेल्या माहीने फावल्या वेळेचा सदुपयोग करीत जीवासोबत आनंदाचे क्षण घालविण्याचा निर्णय घेतला. माही, पत्नी साक्षी आणि कन्या जीवा सध्या निवांत आहेत. सोशल मीडियावर या तिघांची अनेक छायाचित्रे पोस्ट करण्यात आली.
धोनी आणि पत्नी साक्षी यांनी कन्या जीवाचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मसुरी गाठले. माहीने जीवासोबत खूप एन्जॉय केले. त्याने सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला.त्यात तो जमिनीवर सैनिकासारखा व्यायाम करताना दिसत आहे. सेनेप्रति धोनीचे प्रेम आणि सन्मान जगजाहीर आहे. २०११ मध्ये भारतीय सैन्यदलात धोनीने ट्रेनिंग केले. त्याला लेफ्टनंट कर्नलचे मानद पद बहाल करण्यात आले होते.
धोनी मसुरीत मुलीसोबत आर्मीगेम खेळत असल्याचे या छायाचित्रात दिसत आहे.
कसोटीतून निवृत्त झाल्यापासून आधीच्या तुलनेत माही कुटुंबाला अधिक वेळ देतो. ६ फेब्रुवारी २०१५ रोजी जीवाचा जन्म झाला. त्यावेळी माही आॅस्ट्रेलियात भारतीय संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त होता. भारताला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आॅस्ट्रेलियाकडून पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर तो भारतात परतला.
धोनी आता देशासाठी ५ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळताना दिसेल. याशिवाय आयपीएलच्या दहाव्या पर्वातही तो रायझिंग पुणे सुपरजायन्टस्चे नेतृत्व करताना दिसणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Dressed up with a girl,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.