एकेरी ग्रँड स्लॅम चॅम्पियनचे स्वप्न अद्यापही जिवंत: भूपती
By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

एकेरी ग्रँड स्लॅम चॅम्पियनचे स्वप्न अद्यापही जिवंत: भूपती
>नवी दिल्ली: भारतीय टेनिस लीजेंड महेश भूपतीचे देशातील एकेरी ग्रँड स्लॅम चॅम्पियन तयार करण्याचे स्वप्न अद्यापही जिवंत आहे़ भूपतीने काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात हे केले होते़ मात्र काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे होऊ शकला नाही़ देशामध्ये अनेक एकेरी ग्रँड स्लॅम चॅम्पियन असायला हवेत, हे स्वप्न देशातील अव्वल दुहेरी खेळाडूंपैकी एक भूपतीच्या मनात आजही जिवंत आहे़ भूपतीच्या मते पुढील काही वर्षांमध्ये देशामध्ये चंागले एकेरीचे खेळाडू पहावयास मिळतील़ दुहेरीत माहिर आणि अनेक ग्रँड स्लॅम किताबांचा विजेता भूपतीने राजधानीच्या आऱके़ खन्ना स्टेडियमवर देशातील सर्वात मोठ्या शालेयस्तरीय टेनिस स्पर्धा एचसीएल आंतरशालेय टेनिस चॅलेंजर विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी उपस्थित होता़ त्यावेळी तो बोलत होता़