अनिर्णित सामन्यात आॅसी संघाला झुंजवले
By Admin | Updated: July 26, 2015 01:56 IST2015-07-26T01:56:37+5:302015-07-26T01:56:37+5:30
भारत-अ आणि आॅस्ट्रेलिया-अ यांच्यातील सामना आज अनिर्णीत राहिला. या पहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा

अनिर्णित सामन्यात आॅसी संघाला झुंजवले
चेन्नई : भारत-अ आणि आॅस्ट्रेलिया-अ यांच्यातील सामना आज अनिर्णीत राहिला. या पहिल्या चारदिवसीय कसोटी सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा आणि भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या अमित मिश्रा यांनी अनुक्रमे एकूण ६ व ५ बळी घेत विशेष ठसा उमटवला. विजयासाठी २४० धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलिया-अ संघाने ४ बाद १६१ धावा केल्या तेव्हा पंचांनी सामना संपल्याचे घोषित केले.
ओझाने या सामन्यात १३२ धावांत एकूण ६ गडी बाद केले, तर मिश्राने ५ बळी घेतले. त्याआधी भारतीय संघाने कालच्या ३ बाद १२१ या धावसंख्येवरून पुढे खेळताना ८ बाद २०६ धावांवर दुसरा डाव घोषित केला. युवा फलंदाज श्रेयस अय्यरने ३३, तर करुण नायरने २३ धावांचे योगदान दिले. आॅस्ट्रेलिया-अ संघाचा वेगवान गोलंदाज गुरिंदर संधूने २७ धावांत आणि अनियिमत वेगवान गोलंदाज मार्क स्टोइनिस याने १७ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. फिरकी गोलंदाज स्टीव्ह ओकीफेने या सामन्यात एकूण ८ गडी बाद केले. पुढील सामना २८ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यात कसोटी कर्णधार विराट कोहलीदेखील खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत -अ : पहिला डाव ३०१. आॅस्ट्रेलिया-अ दुसरा डाव : २६८ धावा. भारत-अ दुसरा डाव : के. एल. राहुल झे. मेडिंसन गो. हेड २९, अभिनव मुकुंद झे. बेंक्रोफ्ट गो. संधू ४०, चेतेश्वर पुजारा झे. हँडस्कोंब गो. संधू ४२, करुण नायर त्रि. गो. स्टोइनिस २३, श्रेयस अय्यर झे. मेडिंसन गो. फेकटे ३३, नमन ओझा त्रि. गो. स्टोइनिस ४, व्ही. शंकर झे. ख्वाजा गो. ओकिफे १५, अमित मिश्रा नाबाद १३, अभिमन्यू मिथुन झे. हँडस्कोंब गो. ओकिफे ४, अवांतर : ३, एकूण : ७८.३ षटकांत ८ बाद २०६ (घोषित). गोलंदाजी : संधू १६-५-२७-२, फेकेटे १०-३-२८-१, ओकिफे २८.३-६-८१-२, हेड ७-३-२०-१, एबोट १०-२-२९-०, स्टोइनिस ७-२-१८-२.
आॅस्ट्रेलिया अ दुसरा डाव : कॅमरून बेनक्रोफ्ट झे. नायर गो. मिश्रा ५१, उस्मान ख्वाजा झे. नायर गो. मिश्रा १२, ट्रेव्हिस हेड झे. ओझा गो. मिथुन ५०, पी. हँडस्कोंब झे. नमन ओझा गो. प्रज्ञान ओझा ०, निकोलस मेडिंसन नाबाद ३७, मार्कस स्टोइनिस नाबाद ९, अवांतर : २, एकूण : ४६ षटकांत ४ बाद १६१. गोलंदाजी : यादव ६-२-२१-०, ओझा १४-३-४७-१, मिथुन ८-३-१३-१, मिश्रा १३-३-४९-२, शंकर ३-०-१९-०, नायर २-०-१०-०.