द्रविडकडून शिकायला मिळाले
By Admin | Updated: October 13, 2014 06:22 IST2014-10-13T06:22:13+5:302014-10-13T06:22:13+5:30
आपल्या आत्मकथेत इंग्लंड टीम आणि व्यवस्थापनावर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या केवीन पीटरसन याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहे़

द्रविडकडून शिकायला मिळाले
लंडन : आपल्या आत्मकथेत इंग्लंड टीम आणि व्यवस्थापनावर टीका करणाऱ्या इंग्लंडच्या केवीन पीटरसन याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्यावर मात्र स्तुतिसुमने उधळली आहे़ या वरिष्ठ खेळाडूकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. त्यामुळेच खेळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाला, असेही त्याने म्हटले आहे़
क्रिकेटपटू पीटरसन याने आपल्या आत्मकथेत लिहिले की, राहुल द्रविड जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे़ फिरकी गोलंदाजांना यशस्वीपणे सामोरे जाण्यात तो पटाईत होता़ याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ आमच्यामध्ये ई-मेलद्वारे चर्चा व्हायची़ यावेळी त्याच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले आहे़ त्याच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली होती़
पीटरसनने पुढे नमूद केले की, द्रविड एका ई-मेलमध्ये म्हणाला, केपी तू खूप चांगला खेळाडू आहेस़ तू वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही सहज साजोरे जाऊ शकतोस. त्यामुळे फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यास अडचण येते, असे कुणालाही सांगण्याची गरज नाही़ मी अनेकदा तुला फिरकी गोलंदाजांचा यशस्वी सामना करताना बघितले आहे़ केवळ तुला काही चुका दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे़
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) राहुल द्रविडसोबत खेळण्याची संधी मिळाली होती़ यावेळी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर फिरकीचा सामना करण्याची क्षमता अनेक टक्केवाढली होती, असाही उल्लेख पीटरसन याने आपल्या आत्मकथेत केला आहे़ पीटरसनने इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) भरभरून कौतुक केले आहे़ तो म्हणाला, आयपीएल भविष्य आहे़ मी पैसे आणि आयपीएलवर दिवसभर बोलू शकतो़ विशेष म्हणजे काही मित्रांनी विनंती केल्यास मी आयपीएलमध्ये मोफतही खेळू शकतो़ (वृत्तसंस्था)