ड्रॅग मोटरबाईक चॅम्पियनशीप कलीम पाशाचा दबदबा

By Admin | Updated: June 8, 2015 00:23 IST2015-06-08T00:23:50+5:302015-06-08T00:23:50+5:30

ड्रॅग रेसींग शर्यतीत एम २ आणि ओ १ याप्रकारच्या स्पर्धेत अजिंक्यपद आणि एम १ प्रकारातील तृतीय स्थानाच्या जोरावर कलीम पाशा या रायडरने मोटरबाईक अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा राखला.

Drag motorbike championship kaleem pasha domination | ड्रॅग मोटरबाईक चॅम्पियनशीप कलीम पाशाचा दबदबा

ड्रॅग मोटरबाईक चॅम्पियनशीप कलीम पाशाचा दबदबा

मुंबई : ड्रॅग रेसींग शर्यतीत एम २ आणि ओ १ याप्रकारच्या स्पर्धेत अजिंक्यपद आणि एम १ प्रकारातील तृतीय स्थानाच्या जोरावर कलीम पाशा या रायडरने मोटरबाईक अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा राखला.
देशातील या पहिल्या ड्रॅग रेसमध्ये एम २ आणि ओ १ प्रकारात अनुक्रमे १२.४०६ आणि १२.५५४ सेंकदात शर्यत पार करुन पाशा सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. एम १ प्रकारात इक्बाल शेखने १४.०७९ सेंकदात अव्वल क्र मांकाला गवसणी घातली. दुसऱ्या स्थानावर १४.३४३ सेंकद अशी वेळ नोंदवून सय्यद अफ्सार याने बाजी मारली. पाशाने १४.५४९ सेंकदासह तृतीय स्थान मिळवले.
एम २ प्रकारात अ‍ॅन्थेनीने १३.८५३ सेंकदात शर्यत पुर्ण करुन द्वितीय तर संदिप सिंगने १४.०६८ तृतीय स्थान पटकावले. त्याचवेळी एम ४ प्रकारात अजिंक्य बांदिवडेकरने १४.७३३ सेंकदासह प्रथम स्थान पटकावले. सुदिप सिंगने १५.३८५ सेंकदात दुसरे तर १५.७२७ सेंकद अशा वेळेसह तिसरे स्थान अविनाश श्रीवास्तवने पटकावले.
एस ५ प्रकारात जोईल राजुने विजेतेपदावर नाव कोरले. सुशांत कावेलकर व अकबर अली अन्सारी यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. मिर्झा जहांगीर बेगने अवघ्या ११.३८१ सेंकदात एम ६ प्रकारात रेस मध्ये बाजी मारली. मोहम्मद रियाजला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले.

Web Title: Drag motorbike championship kaleem pasha domination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.